Ticker

6/recent/ticker-posts

युवा कार्यशाळा व बाबा आमटे स्मृती व्याख्यानमाला संपन्न किनवट:- 25 डिसेंबर किनवट येथे साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या 27व्या वर्धापन दिनानिमीत्त दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता साने गुरूजी रूग्णालयाचे प्रांगण, किनवट येथे युवकांसाठी


युवा कार्यशाळा व बाबा आमटे स्मृती व्याख्यानमाला संपन्न

किनवट:- 25 डिसेंबर

किनवट येथे साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या 27व्या वर्धापन दिनानिमीत्त दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता साने गुरूजी रूग्णालयाचे प्रांगण, किनवट येथे युवकांसाठी 

“किनवट – माहूर परिसराचा विकास व युवा पिढीचे योगदान” या विषयावर युवा कार्यशाळेचे आयोजन मराठवाडा जनता विकास परिषद शाखा किनवट व भारत जोडो युवा अकादमी तर्फे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. नारायणजी सिडाम तर प्रमुख वक्ते म्हणुन माजी खासदार व्यंकटेशजी काब्दे, अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद, हे लाभले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, पुस्तक व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला साने गुरूजी रूग्णालय परिवारातील सदस्य प्रा. डॉ. योगीता शिंदे व प्रा. डॉ. विजय उपलेंचवार यांना पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल मेहरसिंग चव्हाण, सौ. अर्चना डोंगरे ग्रामपंचायत सदस्य निवडुन आल्याबद्दल आणि सेटट्राईबचे सारंग वाकोडीकर यांनी महाराष्ट्र शासनासाठी महाअसेंब्ली ॲप विकसीत केल्याने साने गुरूजी रूग्णालय परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

प्रमुख वक्ते डॉ. व्यंकटेशजी काब्दे यांनी मराठवाड्याचा विकास या विषयावर व्याख्यान देतांना मराठवाडा मागे राहिण्याचा इतिहास संक्षिप्त स्वरूपात युवकांपुढे मांडला ते म्हणाले की, मराठवाड्याचा सर्वांगीण विकास घडवुन आणण्यात युवक – युवतींच्या सहभागाची  अत्यंत  आवश्यकता आहे. 

कारण आता हा लढा साधा लढा न राहता त्याला संघर्षाची धार देण्याची गरज आहे आणि हे करणे तरूणांच्या सहभागाशिवाय शक्य नाही असे उदगार डॉ. काब्दे यांनी काढले.

 सदरील कार्यशाळेत विद्यार्थी, समाजकार्य व स्पर्धा परिक्षा प्रशिक्षणार्थी, रूग्णसहायक सहाय्यीका प्रशिक्षणार्थी असे एकुण 130 युवक – युवतींनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. गटचर्चेद्वारे किनवट - माहूर परिसरातील विकासासंबंधी चर्चा करून सादरीकरण केले.

या कार्यशाळेस विविध समुहांना डॉ. प्रताप परभणकर, मुरलीधर बेलखोडे,  प्रा. डॉ. सुभाष काळे,  प्रा. सुलोचना जाधव यांनी मार्गदर्शन केले

 तर माजी नगराध्यक्ष इसाखान सरदारखान, के. मूर्ती, प्राचार्य शिंदे सर, प्रा. डॉ. अशोक सिध्देवाड, नांदेड, प्रा. डॉ. आनंद भंडारे, 

प्रा. डॉ. आनंद भालेराव, मुरलीधर बेलखोडे, पत्रकार मिलींद सर्पे, प्रदीप वाकोडीकर, गजानन लाठकर, रिध्दिश्वर बेलखोडे, हे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. सागर शिल्लेवार यांनी तर व्याख्यानमालेचे सुत्रसंचलन प्रा. डॉ.  पंजाब शेरे यांनी केले. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट, बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट, पाटील पोलिस प्रशिक्षण संस्था येथील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.