Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या 27व्या वर्धापन दिनानिमीत्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता साने गुरूजी रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते


साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या वर्धापन दिनानिमीत्त गोदावरी अर्बन बँक पुरस्कृत चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

किनवट:- 24 डिसेंबर

किनवट येथे साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या 27व्या वर्धापन दिनानिमीत्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता साने गुरूजी रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते.

या सोहळ्याचे उद्घाटन भारत जोडो सायकल यात्री व जेष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते डॉ. अशोक भारत – मुजफ्फरपूर, बिहार, संस्थेचे अध्यक्ष, डॉ. अशोक बेलखोडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थीनी कु. आयुषी उत्तरवार व प्रमुख पाहूणे यांनी दीपप्रज्वलन व साने गुरूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. तानाजी माने, निवृत्त सहसंचालक आरोग्य सेवा, डॉ. रामप्रसाद लखोटिया, संस्थापक उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालय, श्री. प्रभाकर पुसदकर, भारत जोडो सायकल यात्री,

 मंत्री, नई तालिम शिक्षण समिती, सेवाग्राम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले.

कु. तेजस्विनी उईके आणि अक्षरा या विद्यार्थीनींनी माय नेम इज माधवी या राष्ट्रीय एकात्मतेच्या गाण्यावर नृत्य सादर केले. भारत जोडो यात्री श्री. प्रभाकर पुसदकर यांनी विविध भाषेतील भारत जोडोचे नारे दिले.

गोदावरी अर्बन बँक पुरस्कृत चित्रकला स्पर्धेचे उदघाटन प्रसिध्द चित्रकार रणजित वर्मा, बालचित्रकार कु. गुंजन रणजित वर्मा, माहूर यांनी चित्र काढुन केले. 

या चित्रकला स्पर्धेमध्ये किनवट व परिसरातील एकुण 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी श्री. हेमंतभाऊ पाटील, सौ. राजश्रीताई पाटील व गोदावरी अर्बन बँकेचे सीईओ यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.

वर्धापन दिनानिमीत्त विद्यार्थ्यांसाठी मोफत दंतरोग तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते डॉ. अश्विनी भंडारे 

यांनी या शिबीरात 28 विद्यार्थ्यांची मोफत दंतरोग तपासणी केली तर साने गुरूजी पॅथॉलॉजी लॅब तर्फे 30 विद्यार्थ्यांचे मोफत रक्त तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, निसर्गसेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, कलाशिक्षक शिवराज बामणीकर, डंबाळे सर, नारायण सर, राठोड सर, संतोष ताडुरकर, यासह विविध शाळेचे शिक्षक उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी साने गुरूजी रूग्णालयाचे सर्व कर्मचारी, कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवटचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले तर उत्तम कानिंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.