Ticker

6/recent/ticker-posts

रत्ननिधी चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई व भारत जोडो युवा अकादमी संचलित साने गुरुजी रुग्णालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरूजी जयंती, बाबा आमटे जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमीत्त दिनांक 28, 29 आणि 30 डिसेंबर 2022 रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत


दिव्यांगासाठी मोफत जयपुर फुट शिबिर.

रत्ननिधी  चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई व भारत जोडो युवा अकादमी संचलित साने गुरुजी रुग्णालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरूजी जयंती, बाबा आमटे जयंती व  साने गुरूजी रूग्णालयाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमीत्त दिनांक 28, 29 आणि 30 डिसेंबर 2022 रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत जयपुर फुट व कृत्रिम अवयव निर्मीती व वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरामध्ये ज्या दिव्यांग व्यक्तीचा हात कोपऱ्यापासुन तुटलेला असेल त्यांना कृत्रिम हात, पाय गुडघ्याच्या खाली किंवा वर तुटलेला असेल त्यांना जयपुरी फुट, किंवा पोलिओमुळे पायाची ताकद गेली असेल किंवा कमजोरी आली असेल अशा सर्व दिव्यांग व्यक्तींना कॅलीपर, अशा साधनांचे मोफत वाटप करण्यात येईल.

या शिबीरात लागणाऱ्या साहित्याची मोजमाप घेण्यात येईल व शिबीर संपन्न झाल्याच्या 15 दिवसानंतर सर्व दिव्यांग व्यक्तींना त्यांना आवश्यक असलेल्या साधनांचे वाटप करण्यात येईल. तरी आपल्या परिचयातील, गावातील गरजु व्यक्तींपर्यत ही माहिती पोहोचवावी असे आवाहन साने गुरूजी रूग्णालय परिवारातर्फे संचालक डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले आहे.

शिबीरासाठी पुर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. या शिबीर आयोजनात तालुका आरोग्य अधिकारी किनवट आणि माहूर, गटशिक्षण अधिकारी कार्यालय किनवट आणि माहूर व कै. उत्तमराव राठोड आदिवासी प्रशिक्षण, विकास व  संशोधन केंद्र किनवट यांचे सहकार्य लाभत आहे. शिबीराचा लाभ घेण्यासाठी गरजु दिव्यांग व्यक्तींची पुर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी साने गुरूजी रूग्णालय येथे प्रत्यक्ष येऊन किंवा खालील मोबाईल क्रमांकावर दिनांक 15 डिसेंबर 2022 पुर्वी नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. मोबाईल नंबर :- संजय बोलेनवार – 9421769602, अजय वल्लेवार – 9673807232

हे शिबीर पुर्णत: विनामुल्य असल्यामुळे नाव नोंदणी किंवा तपासणी किंवा लागणाऱ्या अवयवासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.