Ticker

6/recent/ticker-posts

एड्समुक्त भारत करण्यासाठी जनजागरण करणे आवश्यक ........ प्राचार्य डॉ. के. के.पाटील


एड्समुक्त भारत करण्यासाठी जनजागरण करणे आवश्यक
       ........  प्राचार्य डॉ. के. के.पाटील 

अर्धापूर दि.२/खतीब अब्दुल सोहेल

स्वस्थ भारत बनवण्यासाठी तसेच एड्समुक्त भारत बनवण्यासाठी सर्वांनी जनजागरण करण्याचा संकल्प करावे असे अवहान शंकरराव चव्हाण महाविद्यालयात  १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनजागरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.          
   या प्रसंगी महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रघुनाथ शेटे, प्रा.डॉ. बिराजदार एस.जी. आणि महाविद्यालयातील प्राध्यापक  व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. के. के. पाटील म्हणाले एड्समुक्त भारत निर्माण करण्यासाठी युवकांनी संकल्प केला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या  व रेड रिबन क्लबच्या माध्यमातून एड्स जनजागृती अभियान राबवले जात असतात. या अभियानाचा सर्व पातळीवर लाभ पोहोचवला पाहिजे असे ते म्हणाले. प्रत्येक युवकांनी एड्समुक्त भारतासाठी संकल्प करून त्या दिशेने वाटचाल करावी असे अवहान केले .
    या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय  सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. रघुनाथ शेटे यांनी केले. तर आभार डॉ.एस.जी. बिराजदार यांनी केले.