Ticker

6/recent/ticker-posts

बेंदी (तांडा ) ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता चंपत जाधव सरांनी मानले गावकऱ्यांचे आभार


बेंदी (तांडा) ग्रामपंचायतचे सरपंच अंजनाबाई मनोहर पेंदोर यांच्यासह सर्व सदस्य भरघोस मताने निवडून आल्याने पॅनल प्रमुख तथा सेवानिवृत्त कर्मचारी चंपत कनीराम जाधव सर यांना गावकऱ्यांच्या प्रेमाची थाप व विकासाची कास या धर्तीवर एक हाती सत्ता दिली.


किनवट पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंदी (तांडा) ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दिनांक 18/12/2022 रोजी पार पडली या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारखेपासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पूर्वीच तीन सदस्य बिनविरोध निवडले गेल्याने बळीराम पाटील कॉलेजचे सेवानिवृत्त कर्मचारी चंपत कनीराम जाधव 

यांचा आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेत नियोजनबद्ध पद्धतीने गावातील ज्येष्ठ व तरुण मंडळींना 

सर्व शासकीय योजनांचे महत्त्व पटवून देत प्रचारामधे सर्वांचे मन जिंकून खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक लढविल्याने गेल्या अनेक वर्षापासून बेंदी (तांडा) गावाचा विकास झालेला नाही

 या कारणामुळे गावातील नागरिकांना प्रतिस्पर्धी यांच्या सर्वच उमेदवारांना बगल देत नवीन उमेदवारांना सरपंचसह 

सर्वच सदस्य निवडून आणत गावकऱ्यांनी नवीन इतिहास घडवला आहे गावातील मतदारांचे मत घेतले असता मतदारांनी 

या सर्व बदला मागे सेवानिवृत्त चंपत कराम जाधव यांचा सिंहाचा वाटा मोठ्या प्रमाणात असल्याचे प्रतिनिधी जवळ सांगितले