Ticker

6/recent/ticker-posts

किनवट,दि.१९:साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाचा२७ वा वर्धापनदिन सोहळा साने गुरुजी जयंती ते बाबा आमटे जयंती (ता.२४ व २५) ला साने गुरुजी इमर्जेन्शी व मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल एम आय डी सी,कोठारी येथे संपन्न होणार आहे



किनवट,दि.१९:साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाचा२७ वा वर्धापनदिन सोहळा साने गुरुजी  जयंती ते बाबा आमटे जयंती (ता.२४ व २५) ला साने गुरुजी इमर्जेन्शी व मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल एम आय डी सी,कोठारी येथे संपन्न होणार आहे.

सोहळ्याचे उद्घाटन ता.२४ रोजी सकाळी १० वाजता भारत जोडतो युवा रात्री डॉ.अशोक भारत(बिहार)

 यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी डॉ.रामप्रसाद लखोटिया(उदगीर), डॉ.भानुदास हेळंबे(लातूर) डॉ.तानाजी माने व प्रभाकर पुसदकर हे प्रमुख पाहून म्हणून उपस्थित राहणार आहेत.*


 *ता.२४रोजी सकाळी साडे दहा वाजता रंगभरण व चित्रकला स्पर्धा होईल.दुपारी साडेबारा वाजता लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम होईल

.यात लेखक मधुकर धर्मापुरीकर हे संवाद साधतील.सांयकाळी सांस्कृतिक मेजवानी हा कार्यक्रम होईल.*
  
 *ता.२५ रोजी दुपारी १२ वाजता किनवट-माहूर परिसराचा विकास व युवा पिढिचे योगदान या विषयावर  युवा कार्यशाळा होईल.दुपारी अडीच वाजता स्व.बाबा आमटे स्मृती व्याख्यानमाला होईल.

यात माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे हे विचार व्यक्त करतील.सायंकाळी सात वाजता स्व.उत्तमराव राठोड स्मृती संगीत महोत्सव होईल.

यात इंद्रशेष कला मंच ,वर्धी हे आपली कला सादर करतील.ता.२८,२९ व ३०रोजी दिव्यांगासाठी मोफत जयपूर फुट आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


या सर्व कार्यक्रमांचा परिसरातील जनतेनी लाभ घ्यावा,असे आवाहन साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अशोक बेलखोडे यांनी केले आहे.