Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता. प्र दि २४ राज्यातील सत्तांतरा नंतर किनवट माहुर विधानसभा मतदारसंघामध्ये आ. भिमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या माध्यमातुन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व डॉ बाबासाहेब आंबेडकर


किनवट ता. प्र दि २४ राज्यातील सत्तांतरा नंतर किनवट माहुर विधानसभा मतदारसंघामध्ये आ. भिमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या माध्यमातुन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व डॉ बाबासाहेब आंबेडकर 

यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास एकूण 3 कोटी व शहरातील इतर प्रलंबित विकास कामा करिता 7 कोटी रुपये निधी असे 

एकूण 10 कोटीचा निधी किनवट नगर परिषदेला उपलब्ध करून दिले आहे.

 आ. केराम हे आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करणे हेच धेय्य घेऊन सतत कार्यरत असलेले नेते म्हणुन त्यांची मागील ४० वर्षापासुन किनवट माहुर विधानसभा क्षेत्रात ख्याती आहे. 

२०१९ विधानसभा निवडणूकीत येथिल जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली परंतु सुरवातच हि कोरोना नावाच्या विषाणुने व राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने 

त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले त्यामुळे मागील तीन वर्षात राज्यातील महाविकास आघाडी मुळे किनवट माहुर विधानसभा क्षेत्राचे विकास हे मनाजोगे करता आले नाही. 


परंतु राज्यात सत्तांतर झाल्या नंतर आ. केराम यांचे पिंड हे शिव, शाहू, फुले, 

आंबेडकर व बिरसा याच्या विचारांचे असल्याने इतिहासातील महापुरुष हा त्यांचा आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय असून विधानसभा क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयाची कामे सुरु असतांना

 त्यांच्या मनात असलेल्या विषयाला न्याय मिळवुन देण्याचे प्रयत्न सातत्याने चालु होते त्याअनुषंगाने  नुकतेच त्यांनी हुतात्मा गोंडराजे मैदान सुषोभीकरण करण्याच्या कामास सुरवात केली. 

त्यापाठोपाठ किनवट शहर व तालुक्यातील तमाम शिवभक्त व आंबेडकरी अनुयायांचा आस्थेचा विषय असलेला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा

 या दोन्ही पुतळ्याच्या पुर्णजिवनाचा विषय गाजत असतांना कोणताही गाजावाजा न करता आ. केराम यांनी सदरील दोन्ही पुतळ्या करिता ३ कोटी रुपये निधी मंजुर करवुन घेतला आहे. 

तर भाजपाचे शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी सांगितले कि किनवट नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या नेतृत्वाखाली 

आम्ही व उपनगराध्यक्ष व सर्व पक्षिय नगरसेवकांनी शहरातील दोन्ही महापुरुषाचे पुतळे भव्य स्वरुपात व्हावे या करिता प्रयत्न, 

पाठपुरावा केला होता तर आ. केराम यांनी भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्यांने आम्ही किनवट्च्या जनतेच्या वतीने आमदार केराम यांचे आभार मानतो

आ. केराम यांनी यावेळी बोलतांना सांगितले कि सुमारे ४० वर्ष माझ या शहरात वास्तव्य आहे हे शहर माझ्या जिवनातील सुख व दुखाच्या प्रसंगाचा साक्षिदार आहे व मला 

या शहराने खुप काही दिले आहे त्याच बरोबर जेवढे प्रेम मला या शहरातील नागरीकांनी दिले त्यांचे ऋण मी कधीच फेडु शकत नाही 

परंतु माझ्या हातुन या मतदारसंघातील नागरीकांसाठी जेवढे चांगले होईल ते मी करण्याचे प्रयत्न करणार तर शहरातील व विधानसभा क्षेत्रातील तरुण पिढीने 

आपल्या महापुरुषांना पाहून त्यांच्याकडून बोध घेणे आवश्यक असून शहरात होणारे हे दोन्ही महापुरुषांचे भव्य दिव्य पुतळे युवकांना प्रेरित करतील. )