Ticker

6/recent/ticker-posts

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तालुका कार्यकारिणीच्या ता.अध्यक्षपदी नसीर तगाले तर सचिव पदी राजेश पाटील यांची निवड


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तालुका कार्यकारिणीच्या ता.अध्यक्षपदी नसीर तगाले तर सचिव पदी राजेश पाटील यांची निवड.

किनवट ता.प्रतिनिधी:  आज दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी "आज की न्यूज कार्यालय" गाळा क्रमांक 8 मध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची वार्षिक 

सर्वसाधारण बैठक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.डी.टी. आंबेगावे व जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड 

यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
    

यात तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष- नसीर तगाले, 

तालुका कार्याध्यक्ष- सय्यद नदीम, तालुका सचिव- राजेश पाटील, तालुका सहसचिव- शेख आतिफ, 

तालुका उपाध्यक्ष गंगाधर कदम, बाबुराव वावळे. तालुका कोषाध्यक्ष- प्रज्वल कारले, तालुका सह कोषाध्यक्ष- इंद्रपाल कांबळे, 

तालुका संघटक- विनोद पवार, विशाल भालेराव,रावसाहेब कदम.जितेंद्र चव्हाण,तालुका सदस्य- शुभम शिंदे , गौस खुरेशी अमर सुरोशे, अकबर खान, 
रेहान खान.तसेच कायदेविषयक सल्लागार म्हणून  पत्रकार एडवोकेट जी.एस. रायबोळे व एडवोकेट विलास सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
    
तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ची युवा तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. 

तालुका अध्यक्ष- प्रणय कोवे, तालुका उपाध्यक्ष विशाल गिरमेकर, सुहास मुंडे, सचिव- मारोती देवकते,

 कोषाध्यक्ष- चंद्रकांत कागणे, तालुका प्रसिद्धीप्रमुख- रमेश परचाके यांची निवड करण्यात आली.


सदरील कार्यकारणीस प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे तसेच जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, 

मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांनी सर्व नवनियुक्त  पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.