Ticker

6/recent/ticker-posts

किनवट /प्रतिनिधी: पंतप्रधान घरकुल योजनेतील उर्वरित हप्ता मिळण्यात यावा अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी किनवट नगरपरिषद यांना महिलांच्या वतीने देण्यात आले


पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उर्वरित हप्ता तात्काळ द्या; अन्यथा येत्या पंधरा दिवसात कुटुंबियासह नगरपरिषद समोर उपोषणाला बसणार-महिला

किनवट /प्रतिनिधी:  पंतप्रधान घरकुल योजनेतील उर्वरित हप्ता मिळण्यात यावा अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी किनवट नगरपरिषद यांना महिलांच्या वतीने देण्यात आले.
 
 पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आम्हाला शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे . घराचे बांधकाम चालू केलेले आहेत. 

आमचे उदरभरण हे रोजंदारीवर आहे व आर्थिक परिस्थिती ही हालाखीची आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून हप्ता मिळण्यास विलंब होत असल्याने आमचे कुटुंब वाऱ्यावर लटकल्याप्रमाणे झालेले आहे.

 तरी चालू असलेल्या घर कामाकरिता आमच्याकडे पैसे नसल्याने अतोनात हाल होत आहेत. चालू असलेल्या बांधकामामुळे आम्ही भाड्याने घर घेऊन राहत आहोत. 

त्यामुळे दुहेरी आर्थिक भुर्दंड आर्थिक आमच्यावर पडत असल्याने आम्ही प्रचंड आर्थिक चनचनीला सामोरे जात आहोत.
   

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उर्वरित हप्ता तात्काळ उपलब्ध करून देऊन आम्हाला सहकार्य करावे. 

अन्यथा येत्या पंधरा दिवसात आम्ही आमच्या कुटुंबियासह नगरपरिषद प्रारंगणामध्ये उपोषणाला बसणार आहोत असा इशाराही महिलांच्या वतीने देण्यात आला आहे.