Ticker

6/recent/ticker-posts

किनवट,दि.६ : महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (दि.६) शहर व परिसरात विविध कृतीशील कार्यक्रम घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले


विविध कृतीशील कार्यक्रमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

किनवट,दि.६ : महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (दि.६) शहर व परिसरात विविध कृतीशील कार्यक्रम घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन  करण्यात आले. 

अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी १० वाजता डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ झाला. यावेळी रक्तदान शिबीर व एक वही एक पेन अभियानाचेही आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे मुख्य  आयोजक अॅड.सम्राट सर्पे व निखिल कावळे हे होते.यावेळी अनेकांनी रक्तदान केले.यात तरूणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
      प्रारंभी भारतीय बोद्ध महासभेच्या वतीने तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके 

यांनी अभिवादन केले.यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव, रिपाइंचे दादाराव कयापाक व विवेक ओंकार, 

डॉ.अशोक बेलखोडे,अनिल महामुने, श्रीनिवास नेम्मानिवार,अभय महाजन,अॅड.जी.एस.रायबोळे, देविदास मुनेश्वर,एपीआय विशाल वाठोरे,माधव कावळे, सुरेश जाधव, 

मिलिंद धावणारे, राजाराम वाघमारे, शंकर नगराळे,प्रा.जाधव,उपशाम भगत,भारत गोफणे, चंद्रकांत दुधारे, व्यंकटराव नेम्मानिवार, अशोक नेम्मानीवार,के.मुर्ती,राजेश पाटील, 

गंगुबाई परेकार,भावना दिक्षित, विद्याताई पाटील,अॅड.मिलिंद सर्पे,दिलिप पाटील, संपादक साजिद बडगुजर,विजय जोशी ,मलिक चव्हाण यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
  
 यावेळी अनिल उमरे, गंगाधर कदम व महेंद्र नरवाडे यांनी सामुहिक वंदना घेतली.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनि केले.कलावती ब्लड बँक, आदिलाबाद,गुरुगोविंदसिंहजी ब्लड बँक, नांदेड व साने गुरुजी पॅथालाजी लॅब,

किनवट यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अनेक शिव-फुले -शाहू-आंबेडकरी जनतेंनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना व २६/११च्या हल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभिवादन केले.रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी सतिष कापसे, संघर्ष घुले,आकाश सर्पे,

शुभम पाटील,स्वप्नील सर्पे,सुगत नगराळे,पवण सर्पे, प्रतिक नगराळे आदी युवा पॅन्थर नी पुढाकार घेतला होता. सायंकाळी सात वाजता "गाणे निळ्या नभाचे",हा अभिवादनपर संगिताचा कार्यक्रम होणार आहे.