Ticker

6/recent/ticker-posts

गायरान पट्ट्याची परवानगी आदेश प्रतीची नक्कल देण्यासाठी आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांनी रु. 15,000/- लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी ला. प्र. विभाग नांदेड येथे तक्रार दिली होती




➡ *युनिट       :-* नांदेड 
➡ *तक्रारदार  :-* पुरुष, वय 38 वर्षे
➡ *आरोपी  :-*
1) श्री सुभाष रघुनाथ कोंडलवार, वय 46 वर्षे, व्यवसाय नौकरी महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय, भोकर जि. नांदेड रा. वायफना ता. हदगाव जि. नांदेड 
2) श्री दिपक चंद्रकांत घोगरे, वय 51 वर्षे, रा.सईद नगर, भोकर जि. नांदेड  (खाजगी इसम)
      
➡ *तक्रार प्राप्त:-* 
      दि.06/01/2023

➡ *लाच मागणी पडताळणी:-
      दि.11/01/2023

➡ *लाचेची मागणी रक्कम:-*  रु.12,000/-  

➡ *थोडक्यात हकिकत:-*
              गायरान जमीन खरेदी विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी लागते. सदर परवानगी आदेशाची प्रत मिळणे करिता तहसील कार्यालय येथे जमीन विक्री करणार यांनी सुमारे दिड महिन्यापूर्वी दिलेल्या अर्जावर कार्यवाही न झाल्याने तक्रारदार यांनी परत अर्ज दिला. त्यावेळी यातील लोकसेवक व खाजगी इसम यांनी  तक्रारदार यांना गायरान पट्ट्याची परवानगी आदेश प्रतीची नक्कल देण्यासाठी आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांनी रु. 15,000/-  लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी ला. प्र. विभाग नांदेड येथे  तक्रार दिली होती. 
         त्यानंतर आरोपी लोकसेवक व खाजगी इसम यांची दिनांक 11/01/2023 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदार यांना आदेशाची नक्कल देऊन काम केले आहे. त्याबद्दल बक्षीस म्हणुन रु. 15,000/- लाचेची मागणी करून तडजोडीअंती रु.  12,000/- मागणी केल्याचे निष्पन्न झाले. 
         दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे.

➡  मार्गदर्शक:-
डॉ राजकुमार शिंदे
पोलीस अधिक्षक, 
ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड.

श्री. धरमसिंग चव्हाण
अपर पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि.नांदेड, परिक्षेत्र नांदेड.

➡ पर्यवेक्षण अधिकारी:-
श्री राजेंद्र पाटील,
पोलीस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. नांदेड.

➡ सापळा अधिकारी :-
श्री. नानासाहेब कदम,
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि. नांदेड 

➡ सापळा कारवाई पथक:-
 पोहेकॉ संतोष वच्चेवार, गणेश तालकोकुलवार, पोकॉ ईश्वर जाधव, चापोना प्रकाश मामुलवार, गजानन राऊत, नीलकंठ यमुनवाड  ला.प्र.वि.युनिट नांदेड

➡ तपास अधिकारी :-
श्री. नानासाहेब कदम,
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि. नांदेड
----------------------
*नांदेड  जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड
मोबाईल क्रमांक 9623999944
राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड
मोबाईल क्रमांक - 7350197197
*कार्यालय दुरध्वनी - 02262-253512*
*@ टोल फ्रि क्रं. 1064