Ticker

6/recent/ticker-posts

किनवट. दि.16(प्रतिनिधी) जमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात हकनाक बळी गेलेले सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार यांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्की कोल्हे याला अजूनही पोलीस अटक करू न शकल्यामुळे, मयताचे कुटंबीय,नातेवाईक व हितचिंतक संतापले असून, 25 जानेवारी पर्यंत


किनवट. दि.16(प्रतिनिधी)  जमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात हकनाक बळी गेलेले सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार यांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्की कोल्हे याला अजूनही पोलीस अटक करू न शकल्यामुळे, मयताचे कुटंबीय,नातेवाईक व हितचिंतक संतापले असून,

 25 जानेवारी पर्यंत मुख्य आरोपीला अटक न झाल्यास उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकार्‍यासह सर्व संबंधित यंत्रणांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात दिलेला आहे.": 

"निवेदनात म्हटले की, हल्लेखोरांवर 302,326, 504,505 व 34 ही कलमे दाखल होऊन आज 25 दिवस उलटून गेले आहेत. 

मात्र यातील मुख्य आरोपीस शोधण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही.

 हल्ला केलेल्या पाच जणांपैकी चार व्यक्तींना न्यायालयीन कोठडी मिळालेली असून, मुख्य आरोपी मात्र फरार आहे.


 त्यामुळे मयताचे कुटुंबीय भयभीत असल्याचा उल्लेख निवेदनात केलेला आहे. कुटुंबातील कर्तापुरुष गेल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली असून, येत्या 25 तारखेपर्यंत मुख्य आरोपी विक्की कोल्हे यास अटक करून त्याचेविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, 


अन्यथा 25 तारखेच्या सकाळपासून आम्ही सर्व कुटुंबीय, नातेवाईक व हितचिंतक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरूवात करूत, असा इशारा दिला आहे.

 या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनीसुद्धा पोलीस प्रशासनावर नाराजी दर्शवून निवेदनाद्वारे मुख्य आरोपीच्या अटकेची मागणी केलेली आहे. आमदार भीमराव केराम

 यांनी देखील याप्रकरणी पुढाकार घेऊन सदरील प्रकरण नीट न हाताळल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या पो.नि.अभिमन्यू सोळंकेंच्या जागेवर पो.नि.दीपक बोरसे 

यांना प्रभारी म्हणून बोलावून घेतले असल्याची चर्चा काल शहरात होती. आ.केराम यांनीसुद्धा येथील पोलीस प्रशासनाच्या कारभारविरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाकडे लेखी तक्रार केलेली आहे. 

श्रीकांत कंचर्लावार हत्या प्रकरण सध्या तापले असून, पोलिस प्रशासनाच्या विरोधात व्यापारी असोशिएशननेसुद्धा आक्रमक भूमिका घेतली असून

या साखळी उपोषणात शहरातील सर्व आर्यवैश्य समाजातील व्यापारी सहभागी होणार आहेत.



      साखळी उपोषणासाठी दिलेल्या निवदनावर अक्षय श्रीकांत कंचर्लावार, समिक्षा श्रीकांत कंचर्लावार, माधवी व्यंकटेश कंचर्लावार, व्यंकटेश कंचर्लावार, सुरेश