Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर येथील पत्रकार तथा सामजिक कार्यकर्ते जावेद अहमद यांना पुरस्कार जाहीर


देगलूर येथील पत्रकार तथा सामजिक कार्यकर्ते जावेद अहमद यांना पुरस्कार जाहीर.        देगलूर -.                                                                                    देगलूर येथील पत्रकार तथा सामजिक कार्यकर्ते जावेद अहमद यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीयरत्न सन्मान 2023 हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार सोहळा दिनांक 26 जानेवारी रोजी मेयर हॉल बीएमडब्ल्यू शोरूम लाईन अंधेरी वेस्ट मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 

देगलूर शहर व तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य याबद्दल जावेद अहमद यांचे आहे.

 निस्वार्थपणे ते पत्रकारिता करीत आहेत. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. 

सामाजिक क्षेत्रात गेल्या आठ वर्षांपासून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देत आहेत. या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.