Ticker

6/recent/ticker-posts

किनवट आगारात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; शिबिरास कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


किनवट आगारात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; शिबिरास कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

किनवट (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभागातील किनवट आगारातर्फे रस्ते सुरक्षा मोहीम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून आज दिनांक १७/०१/२०२३ रोजी सकाळी दहा वाजता किनवट 

आगार व उपजिल्हा रुग्णालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिरात सर्व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 सविस्तर वृत्त असे की सध्या राज्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे राज्यात रस्ते सुरक्षितता मोहीम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून 

नांदेड विभागातील किनवट आगारात उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा व किनवट आगार यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 या शिबिराचे उद्घाटन आगार प्रमुख संजय अकुलवार यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज घडसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

आगारातील सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी करण्यात आली जवळपास ११० कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

 सर्वप्रथम सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक माहिती व सल्ला देण्यात आला.
या कार्यक्रमाला वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ उंचेगावकर, 

डॉ रबडे, कृष्णा निरडे, पंकज राठोड, डॉ. प्रकाश चौखंडे, सरोदे सह किनवट आगाराचे कार्यशाळा अधीक्षक वाय एच खिल्लारे, शेख गयासुद्दीन, 

जी आर सटलावार, एस डुबेवार,पी सी डवरे,डी एल पालेपवाड,गुरुसिंह ठाकूर इत्यादींची उपस्थिती होती एकंदरीत या आरोग्य शिबिरास कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

किनवट आगाराच्यावतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.