Ticker

6/recent/ticker-posts

मानवी "षडविकार" हेच कायदा व सुव्यवस्था भंग होण्याचे कारण:- ॲड. विलास सूर्यवंशी (शामीले)* किनवट (तालुका प्रतिनिधी) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे आज उमरी (बाजार) तालुका किनवट येथे कायदेविषयक शिबीर व लोक आदालत घेण्यात आली


*मानवी "षडविकार"  हेच कायदा व सुव्यवस्था भंग होण्याचे कारण:-  ॲड. विलास  सूर्यवंशी (शामीले)* 

किनवट (तालुका प्रतिनिधी) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे आज उमरी (बाजार) तालुका किनवट येथे कायदेविषयक शिबीर व लोक आदालत घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती वडगावकर मॅडम तर पॅनल सदस्य म्हणून ॲड. श्रीकृष्णा राठोड (नंदगावकर) ॲड टेकसिंघ चव्हाण यांनी काम पाहिले. तसेच कायदेविषयक शिबिरामध्ये श्री सागर शिल्लेवार 

यांनी उद्घाटन पर भाषण केले तर विस्तार अधिकारी श्री तिरमनवार यांनी शासकीय योजनेची विस्तृत अशी माहिती सांगितली तर ॲड.विलास सूर्यवंशी  यांनी आपल्या अद्वितीय शैलीत "आरोपीची अटक त्यापूर्वीचे अधिकार व अटकेमधील अधिकार"

 या विषयावर बोलताना त्यांनी "अटक" व "हवालात" यातील फरक सांगितला तसेच परमपूज्य संविधानातील अनेक कलमा विषयक माहिती दिली तसेच 

  "मानवी  षडविकार हेच कायदा व सुव्यवस्था  भंग होण्याचे कारण तथा न्यायालयात दावे दाखल होण्याचे कारण आहे 

असे सांगितले बोलत असताना शिबिरार्थी लाभार्थी हे मंत्रमुग्धपणे शिबिराचा हर्ष उल्हासात आनंद तथा लाभ घेत होते, तसेच ॲड श्री कृष्णा राठोड (नंदगावकर) यांनी पोस्को कायद्याविषयी विस्तृत माहिती दिली 

तर ॲड  शिरपुरे यांनी स्त्रीविषयक अधिकाराची जनसामान्याच्या भाषेमध्ये माहिती दिली तर अध्यक्षीय भाषण हे न्यायमूर्ती वडगावकर मॅडम यांनी केले

 या कार्यक्रमाला ॲड गावंडे साहेब, ॲड येरेकर साहेब, ॲड सिडाम साहेब तसेच विशेष व प्रभावी शैलीत जीवन कोटरंगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

 या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी घुले साहेब यांच्या सह सहाय्यक कर्मचारी तसेच उमरी गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी तथा प्रतिष्ठित नागरिक  आणि स्त्रिया या उपस्थित होत्या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारचे तंटे, 

केसेस सोडवण्याचा किंबहुना मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून समस्त न्यायालय हे जनसामान्याच्या दारी येत आहे हा शासनाचा अद्वितीय उपक्रम आहे असे सर्वसामान्य जनतेतून बोलल्या जात आहे.