Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता. प्रतिनिधी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तर्फे प्रजासत्ताक दिनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ध्वजारोहण वेळी ठेवण्यात यावी


प्रजासत्ताक दिनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ध्वजारोहण वेळी ठेवण्यात यावी-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तर्फे निवेदन

किनवट ता. प्रतिनिधी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तर्फे  प्रजासत्ताक दिनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ध्वजारोहण वेळी ठेवण्यात यावी

 या बाबतचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागिय अधिकारी किनवट व तहसीलदार  किनवट यांना देण्यात आले.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन . भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  राज्य घटना लिहुन भारताला समर्पित केले 

भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. 

जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती.

 त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. 
भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. 

या दिवशी प्रत्येक शाळा, महाविद्यालय व शासकिय कार्यालयात प्रजासत्ताक हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातो त्याचे स्मरण म्हणुन किनवट उपविभागिय कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर 

यांच्या प्रतिमा ठेवून ध्वजारोहण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे,

 मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव  व  जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सादर  करण्यात आले आहे.
 
तालुका अध्यक्ष नसीर तगाले, 
तालुका सचिव राजेश पाटील, 
तालुका कार्याध्यक्ष शेख नदीम, 

तालुका उपाध्यक्ष गंगाधर कदम, युवा तालुका अध्यक्ष प्रणय कोवे, ता.सचिव मारोती देवकते, ता.उपाध्यक्ष विशाल गिम्मेकर, ता.युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, 

नरसिंग भागीरथी,मुजाहिद सौदागर, आदी उपस्थित होते.