Ticker

6/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनाच्या पुरवसंधेवर सरस्वती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने किनवट शहरातील पुतळे स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली यावेळी पुतळा परिसर स्वच्छ करून पाण्याने पुतळे धुण्यात आले



प्रजासत्ताक दिनाच्या पुरवसंधेवर सरस्वती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या  वतीने किनवट शहरातील पुतळे स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली यावेळी पुतळा परिसर स्वच्छ करून पाण्याने पुतळे धुण्यात आले 

हार अर्पण करून महापुरुषांचा जयजयकार करत ही मोहीम राबविण्यात आली शहरातील क्रांतिकारी शहीद बिरसा मुंडा, 

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,शाहीर अण्णाभाऊ साठे, संविधानस्तंभ स्वच्छ करून डॉबाबासाहेब आंबेडकर  

परिसरात राष्ट्रगीताने मोहिमेची सांगता करण्यात आली विद्यार्थ्यांच्या मनात महापुरुषांप्रती आदरभाव निर्माण व्हावा शहरातील पुतळ्यांचे पावित्र्य राखले जावे हा हेतू जपण्यात 

यावा यासाठी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार व प्राचार्य डॉ आनंद भंडारे यांच्या संकल्पनेतून जानेवारी 2015 पासून नियमित महिन्याच्या  पहिल्या आठवड्याला व राष्ट्रीय सण म्हणजेच

 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून 

याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्तरावरून दखल घेत अभियान राबवून  महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान करण्यात यावा असे आवाहन पूर्वी करण्यात आलेआहे 

अशा आगळ्यावेगळ्या अभियानाचे किनवट परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे 

या मोहिमेत डॉ सुनील व्यवहारे, विवेक चनमनवार, डॉ मनोहर थोरात कार्यक्रमाधिकारी

 डॉ रामकिशन चाटे व प्रा अजय किटे यांच्या सह विद्यार्थी -विद्यार्थीनी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते