Ticker

6/recent/ticker-posts

सुरेश जिपकाटे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड.नुकत्याच पार पडलेल्या किनवट तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पार्डी (सी.) -येथील सरपंच म्हणून अनुसया शंकर कुमरे ह्या विजयी झाल्या.


सुरेश जिपकाटे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड.

नुकत्याच पार पडलेल्या किनवट तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पार्डी (सी.) -येथील सरपंच म्हणून अनुसया शंकर कुमरे ह्या विजयी झाल्या. तर

त्याच्या अध्यक्षतेखाली काल पार्डी सी . येथील उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली उपसरपंच पदासाठी  सुरेश नामदेव जिपकाटे 

यांचा एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.


यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून 
ए.एन.बडे (विस्तार अधिकारी)यांनी काम पाहिले. 

व त्यांना गजानन राऊलवार (ग्रामसेवक) संजय बेजावार (ग्र.पं कर्मचारी) यांचे सहकार्य लाभले.


याठिकाणी ग्रा.पं.सदस्य शंकर कुमरे,शुभम आत्राम, ज्योती गवळी ,भुदेवी म्याकलवार व गावातील नागरिक उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंच पदी निवडून आलेल्या अनुसया शंकर कुमरे व उपसरपंच पदी निवड झालेल्या 

सुरेश जिपकाटे यांना  ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थाकडून पुढील वाटचालीसाठीशुभेच्छा देण्यात आल्या.