Ticker

6/recent/ticker-posts

किनवट पोलीस ठाण्यातील कर्मचारी गजानन चौधरी व सुनील कोलबुद्धे यांची नांदेड पोलीस नियंत्रण कक्षात उचलबांगडी


किनवट पोलीस ठाण्यातील कर्मचारी गजानन चौधरी व सुनील कोलबुद्धे यांची नांदेड पोलीस नियंत्रण कक्षात उचलबांगडी

किनवट शहरातील व्यापारी कंचर्लावार बंधुवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात हयगय केलीच्या कारणावरून किनवट पोलीस ठाण्यातील कर्मचारी गजानन चौधरी व सुनील कोलबुद्धे 


त्यांना येथून 17- पोलीस नियंत्रण कक्षात सलग्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
  
   जमिनीच्या वादातून शहरातील व्यापारी बंडू व श्रीकांत कंचर्लावार या दोघा बंधू वर संतोष कोल्हे व इतरांनी 12 डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला केला.

 यात गंभीर जखमी झालेल्या श्रीकांत कंचर्लावार यांचे 27 डिसेंबर रोजी हैदराबाद येथे निधन झाले होते. 

कंचर्लावार बंधूंना मारहाण करणाऱ्या आरोपीच्या अटके प्रकरणी पोलिसांनी हायगय केल्याचा आरोप करत आर्य वैश्य समाज व व्यापारी संघ आक्रमक झाले होते.
    त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत कोकाटे 

यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळंके यांना सक्तीच्या रजेवर पाठवून किनवट ठाण्याच्या प्रभारी पदी दीपक बोरसे यांची नियुक्ती केली आहे.
    
दरम्यान कंचर्लावार हल्ला प्रकरणातील 5 वा  आरोपी विकी कोल्हे 

यांच्या अटकेचे प्रकरण गांभीर्याने न हाताळणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी कंचर्लावार कुटुंबाने

 25 जानेवारीपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. 

या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्यातील कर्मचारी गजानन चौधरी व सुनील कोलबुद्धे यांची येथून उचल बांगडी करून त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात सलग्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.