Ticker

6/recent/ticker-posts

हाथ से हाथ जोडो" अभियान व काँग्रेस पक्ष वाढीसाठी गोकुंदा जिल्हा परिषद गट "निरीक्षक" पदी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद भालेराव यांची नियुक्ती.किनवट


हाथ से हाथ जोडो" अभियान व काँग्रेस पक्ष वाढीसाठी गोकुंदा जिल्हा परिषद गट "निरीक्षक" पदी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद भालेराव यांची नियुक्ती.

किनवट/ता.प्रतिनिधी :  हात से हात जोडो अभियान व पक्ष संघटनेच्या कार्यासाठी जिल्हा परिषद गट गोकुंदा तालुका किनवटच्या 

 "गट निरीक्षक" पदी किनवट टुडे न्यूज चे संपादक तथा काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद भालेराव 

यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केली आहे.
   
  गोकुंदा जिल्हा परिषद गटामध्ये "हात से हात जोडो" अभियान यशस्वी करण्यासाठी कार्य करून काँग्रेस पक्षाच्या धोरणा नुसार

 सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करावे. 

अशा शुभेच्छा ही जिल्हाध्यक्ष तर्फे देण्यात आल्या आहेत . 
  
  किनवट तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण निहाय नियुक्त्या जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर

 यांनी केल्या असून सर्वांना नांदेड येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, 

काँग्रेसचे ज्येष्ठनेते माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर,माजी मंत्री डी.पी. सावंत, 

आ. मोहन अण्णा हंबर्डे,आ. जितेश अंतापुरकर, जिल्हाध्यक्ष गोविदराव शिंदे नागेलीकर,

 काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेंद्र घोडजकर सह अनेक नेते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
 
जिल्हापरिषद गट मांडवी-  ईश्वर कुवरसिंग चव्हाण, मोहपुर- नारायण धारबाजी दराडे, 

सारखणी- रमेश रेकुलवार, बोधडी- सुभाष बाभुळकर, इस्लापूर- बालाजी दुरपडे पाटील, जलधरा- सुरेश सोळंके पाटील, गोकुंदा- आनंद भालेराव.

तर पंचायत समिती गणासाठी मांडवी- रमेश गंगना राहुलवार, कोठारी- उत्तम पुरणसिंग राठोड, 

मोहपूर- प्रकाश दतराम गेडाम, घोटी- नवीन गेमसिंग जाधव, गोकुंदा- निखिल गिमेकर, 

चिखली- संतोष अडकिने, बोधडी- त्र्यंबक मुकुंदराव केंद्रे, पाटोदा- सुभाष बाबू राठोड, जलधरा- संतोष जवाहरसिंग पेळे, 

परोटी- गजानन गोपीचंद जाधव, इस्लापूर- अनुप नंदकुमार देशमुख, शिवनी- बापूजी गंभीरा चव्हाण, सारखणी- शेख जुनेद, उमरी- विजय टोरमल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे .