किनवट पोलीस स्टेशन चा कार्यभार हाती घेतल्यानंतर किनवट शहरातील अवैध धंदे बंद -पो.नि. दिपक बोरसे*
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी किनवटचे पो.निरीक्षक दिपक बोरसे यांची भेट घेऊन केली विविध समस्यावर चर्चा
किनवट/ता.प्रतिनिधी: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी किनवट पो.स्टे.येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची भेट घेऊन विविध समस्यावर चर्चा केली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे म्हणाले की, किनवट पोलीस स्टेशन चा कार्यभार हाती घेतल्यानंतर किनवट शहरातील अवैध धंदे बंद झाले आहेत.
स्व.बाळासाहेब ठाकरे चौक व बस स्टँड येथे विद्यार्थिनींना छेडछाडच्या घटना घडत होत्या
त्या अनुषंगाने बऱ्याच नागरिकांनी आमच्याकडे तक्रारीही केल्या होत्या आम्ही पायी पेट्रोलिंग करत आहोत.
तसेच स्व. ठाकरे चौकात नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले आहेत. आशावर कायदेशीर कारवाई करीत आहोत.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, कायद्याचे पालन होईल याकडे लक्ष देणे त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करीत आहोत .
किनवट येथील व्यापारी स्वर्गवासी श्रीकांत कांचार्लवार यांच्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की,आमच्यातर्फे पूर्ण प्रयत्न चालू आहेत व आरोपीला लवकरच पकडण्यात येईल.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष नसीर तगाले, तालुका सचिव राजेश पाटील,
तालुका कार्याध्यक्ष सय्यद नदीम, तालुका उपाध्यक्ष गंगाधर कदम, युवा तालुका अध्यक्ष प्रणय कोवे, ता.सचिव मारोती देवकते, ता.उपाध्यक्ष विशाल गिम्मेकर,