Ticker

6/recent/ticker-posts

आमदार साहेब जरा आमची व्यथा पण ऐकुण घ्या.गेल्या ७० वर्षा पासून मांजरीमाथा गावास रस्ताच नाही किनवट तालुक्यापासून जवळच असलेल्या


आमदार साहेब जरा आमची व्यथा पण  ऐकुण घ्या.
गेल्या ७० वर्षा पासून मांजरीमाथा गावास रस्ताच नाही

  किनवट तालुक्यापासून जवळच असलेल्या
 

जलधरा ग्रामपंचायत गणापासुन ३कि.मी. अंतरावर वसलेले मांजरीमाथा हे गाव गेली ७० वर्षापासुन नरक यातना भोगत आहे या गावाला  ये-जा करण्याकरीता कुठल्याही प्रकारचा पक्का रस्ता अद्याप बांधण्यात आलेला नाही 

या गावची लोकसंख्या ४५० ते ५००पर्यंत असुन येथे सर्व वस्त्या घरे हे बहुतांश आदीवासी बहुल समाजाची आहेत मांजरी माथा हे गाव माळरानात वसलेल आहे 
परंतु ये-जा करण्याकरीता गावक-यांना पायी चालावे लागते पक्का रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून जिवावर उदार होऊन मार्ग काढावा लागतो तसेच  गर्भवती महीला, वयोवृद्ध ,शालेय विद्यार्थी 

यांना खुप संकटाचा सामना करावा लागतो आज पर्यंत २० ते २५ लोक या रस्त्या अभावी मृत्युमुखी पडले आहेत वयोवृद्ध लोक तर यांना अती प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. 

या रस्त्याच्या कामाकरीता लोकप्रतिनिधी ,राज्य शासन- प्रशासन व संबधीत बांधकाम विभाग  अनेक वेळा निवेदने, देण्यात आली 
परंतु यांच्या या गंभीर समस्येकडे कोणताही प्रतीनीधी ना कोणता अधिकारी फीरकला नाही यामुळे नागरीक नाईलाजास्तव अमरण उपोषणाच्या पवित्र्यात आहे 

तात्काळ गावातील गावक-यांच्या समस्या जाणून घेऊन पक्का डांबरी रस्ता बाधुन हि समस्या कायमची सोडवावी 

अशी मागणी आहे अन्यथा नाईलाजाने  तेथील नागरीक करीत आहे २४ जानेवारीला उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार 

असे गावक-यांनी सांगीतले आहे ही बाब विकासाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे.