Ticker

6/recent/ticker-posts

वृक्ष लागवड करा अन्यथा आंदोलन छेडू - राहुल नाईक, विधानसभा अध्यक्ष, रा. कॉ.किनवट ता प्र दिनांक 15 नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट - माहूर - धनोडा या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 6 वर्षापासून काम चालू आहे



वृक्ष लागवड करा अन्यथा आंदोलन छेडू - राहुल नाईक, विधानसभा अध्यक्ष, रा. कॉ.

किनवट ता प्र दिनांक 15  नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट - माहूर - धनोडा या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 6 वर्षापासून काम चालू आहे यामुळे अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे त्याच प्रमाणे या मार्गावरील वृक्षांची देखील कत्तल करण्यात आली आहे. 

तरी या मार्गावर दोन्ही बाजूने वृक्ष हे आवश्यक असून त्या करिता प्रशासनाने तत्काळ पाऊले उचलावी अन्यथा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करू अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.


सदर महामार्गावर वृक्षाची लागवड करणे हे कोणाचे काम आहे ? कंत्राटदाराचे काम आहे की संबंधित विभागाचे याविषयीं व 

या विषयाशी आम्हाला काहीही एक देणे घेणे नसून शासनाकडे विविध विभाग कार्यरत आहेत जसे कृषी, सामाजिक वनीकरण, वन विभाग तसेच यांच्याशी संबंधित महामंडळे, एवढी सगळी यंत्रणा असून देखील अद्याप एक ही वृक्ष या मार्गावर लावण्यात आलेला नाही 

तर हजारो वृक्ष जे 100 ते 150 वर्ष जुने होते ते पाडण्यात आले आहेत तर या मार्गावर वृक्ष लावण्यासाठी आताच काही उपाययोजना केली गेली तर आगामी 3 ते 4 वर्षात ते उपयोगी ठरतील. 

या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विसवण्यासाठी, सावली करिता, प्रदूषण रोखण्यााठी, पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी ही वृक्ष उपयुक्त ठरणार असून आगामी काळात व पावसाळा पूर्वी 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही लिंब, चिंच, वड, पिंपळाची जास्तीत जास्त वृक्ष या मार्गावर लावणार आहोत असे ही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

 तर शासनाच्या भल्यामोठ्या यंत्रणेने ही वृक्ष लागवडी करिता पुढाकार घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला आहे.