Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी- मागील पाच वर्षापासून कासव गतीने सुरू असलेल्या किनवट शहरासह कोठारी ते हिमायतनगर हा राष्ट्रीय महामार्ग तातडीने मार्गी लावावा या प्रमुख मागणीसाठी आज 15 फेब्रुवारी रोजी किनवट येथील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय विस्तारित बैठक घेण्यात आली


किनवट/प्रतिनिधी- मागील पाच वर्षापासून कासव गतीने सुरू असलेल्या किनवट शहरासह कोठारी ते हिमायतनगर हा राष्ट्रीय महामार्ग तातडीने मार्गी लावावा या प्रमुख मागणीसाठी आज 15 फेब्रुवारी रोजी किनवट येथील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय विस्तारित बैठक घेण्यात आली असून 

या बैठकीत सांगोपांग चर्चा होऊन राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समिती, प्रसिद्धी समिती गठीत करण्यात आली व जनजागृती करून वेगवेगळ्या स्वरूपाचे जनआंदोलन करण्याचे ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आले.
          
   गेल्या पाच ते सहा वर्षापासून कोठारी ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे.  कंत्राटदाराच्या निष्क्रिय कारभारामुळे जागोजागी  काम  अर्धवट अवस्थेत आहे. 

अर्धवट निकृष्ट रस्त्यामुळे अपघाताचे प्रसंग उदभवत आहेत तर धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी निवेदने देऊनही फायदा होत नसल्याने नागरिक संतापले असून 

वाहनधारकासह शेतकऱ्यांना होणारा त्रास तसेच रस्त्याचा निकृष्ट दर्जा पाहता हे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी किनवट येथील सर्वपक्षीय नेते,सामाजिक संघटनेचे नेते, पत्रकार,

 वकील,व नागरिकांची विस्तारित बैठक  15 फेब्रुवारी रोजी तहसील जवळील जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहाच्या  प्रांगणात घेण्यात आली.

बैठकीत व्यंकटराव भंडारवार यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामासह कामाला होणारा विलंब याबद्दल सविस्तर मांडणी केली. 

अधिकारी व कंत्राटदाराच्या मनमानीमुळे नागरिकांना घोरयातना भोगाव्या लागत आहेत.  याबाबत केंद्रीयमंत्री मा.ना. नितीनजी गडकरी 

यांच्या निवास स्थानापर्यंत आंदोलन केले पण दखल झाली नसल्याचे सांगितले तर वैजनाथ करपुडे पाटील व मुसाखान 

यांनी राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी जन आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. 

बैठकीत राष्ट्रीय महामार्गाबद्दल सांगोपांग चर्चा होऊन राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समिती, प्रसिद्धी समिती गठीत करण्यात आली

 तसेच आंदोलनाच्या अनुषंगाने 17 व 18 फेब्रुवारी रोजी जनजागृती करणे आणि 1मार्च पासून जलधारा फाटा येथे बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

बैठकीला शेषराव पाटील सावरगाव, वैजनाथ करपुडे पाटील, मारोती दिवसे पाटील, अजय कदम पाटील, सुनिल येरेकर, शैलेश गटलेवार, 

अमरदीप कदम पाटील,पत्रकार बि.एल. कागणे, गोकुळ भवरे, अॅड मिलींद सर्पे, फुलाजी गरड पाटील, प्रमोद पोहरकर, दिलीप पाटील,

 दत्ता जायभाये, जगदीश सामनपेल्लीवार,आशिष देशपांडे, सुरेश कावळे, साजिद बडगुजर, मलिक चव्हाण, संतोष सिसले, जेष्ठ नागरीक किशनराव यासमवार, सय्यद अनवर, 

गोविंदराव सिरमनवार, प्रशांत कोरडे, अहमद खालिद, अहमद शफी, अक्रम शेख सरदार, सुशील शिंदे, नसीर तगाले फसीउल्ला जितेश घोडाम,अब्दुल गणी, अब्दुल वाहिद,  यांच्यासह विविध पक्षाचे नेते पत्रकार वकील व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.