Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुका अभिवक्ता संघ 2023 - 2025 कार्यकारणी जाहीरकिनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट अभिवक्ता संघ ची नवीन कार्यकारणी आज दिनांक 3 /2 /2023 रोजी जाहीर करण्यात आली


किनवट तालुका अभिवक्ता संघ 2023 - 2025 कार्यकारणी जाहीर
किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट अभिवक्ता संघ ची नवीन कार्यकारणी आज दिनांक 3 /2 /2023 रोजी जाहीर करण्यात आली 

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली तर सचिव व कोषाध्यक्ष हे बिनविरोध निवडून देण्यात आले. 

आज सकाळी 11 ते 5 च्या दरम्यान अभिवक्ता संघाच्या 50 सदस्या पैकी 49 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला उपाध्यक्षपदी पदासाठी ॲड. श्रीकृष्ण राठोड यांनी 25 मत घेऊन प्रतिस्पर्धी ॲड विलास शामिले (सुर्यवंशी)  यांना 24 मते पडले , 

अध्यक्ष पदासाठी ॲड. आर.डी. सोनकांबळे यांना 28 तर प्रतिस्पर्धी ॲड. के.के मुनेश्वर यांना 21 मत पडले अध्यक्षांना आठ मतांनी विजय प्राप्त केला निवडून आलेल्या उमेदवारांनी आमच्या किनवट तालुका प्रतिनिधीशी बोलताना

 किनवट येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापना करण्यासाठी आम्ही मी अध्यक्ष या नात्याने सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच सर्व अभिवक्ता बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्याचा कसोटीने प्रयत्न करेल तसेच उपाध्यक्ष श्री ॲड. कृष्ण राठोड (नंदगावकर) 

यांनी सुद्धा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आणण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले निवडणूक अधिकारी म्हणून वरिष्ठ विधी ज्ञ ॲड. एस.डी राठोड ॲड. बिपिन पवार ॲड. सुनील येरेकर 

यांनी काम पाहिले निवडणूक शांततेत पार पडली  तसेच सर्वानुमते सचिव म्हणून ॲड शिरपूरे

 यांना तर कोषाध्यक्ष म्हणून ॲड. एम एम बडगुजर यांना बिनविरोध निवडून देण्यात आले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय किनवट येथे आणण्यासाठी अभिवक्ता संघांनी नवयुवक यांना संधी देऊन समस्त 

किनवट - माहूर तालुक्यातील अत्यंत निकडी चा प्रश्न अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय नव नियुक्त पदाधिकारी यांच्या मार्फत सोडवून घेण्याचा तसेच अभिवक्ता संघ 

किनवट यांनी नवयुवकांना संधी देऊन उत्कृष्ट परंपरा निर्माण केली आहे आता येणारा काळच ठरवेल की 

किनवट येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापन होते किंवा कसे तसेच अभिवक्ता संघाची समोरील नियोजनात्मक नीती काय असेल याकडे समस्त किनवट -माहूर तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.