कोठारी( सिंध)येथील सरपंच व उपसरपंच यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी
मांडवी प्रतिनिधी
कोठारी( सिंध )ग्रामपंचायत ही एकूण चार गाव अंतर्गत असून येथे ग्रामसभा ही 26 जानेवारी रोजी कोरम पूर्ण अभावी रद्द झाली होती ती सभा 14 फेब्रुवारी रोजी होणार अशी 2 फेब्रुवारी रोजी ग्रामसभेची नोटीस लावण्यात आली.
पण ऐनवेळी ग्रामसेवक आलेले नाही असे सरपंचांनी सांगून ही सभा रद्द करण्यात आलेली आहे अशी असे सागितले.
पण ग्रामसेवक यांच्या मते या ग्रामसभेची कोणत्याही प्रकारची मला माहिती नव्हती आणि ग्रामसभेच्या नोटिस वर माझी कोणतीही सही नाही परस्पर सरपंच यांनी ही ग्रामसभा आयोजित केलेली आहे असे ग्रामसेवकाने सांगितले.
सरपंच व ग्रामसेवक यांच्यात कोणत्याही प्रकारचे सुसंवाद नसल्यामुळे कोठारी सिंध
येथील गावकरी जनता यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे ग्रामसभ रद्द ज्यांचा मुळे झाली. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे
दरम्यान या 14 फेब्रुवारी रोजी आयोजित ग्रामसभेमध्ये मागील प्रोसिडिंग वाचन करणे पुढे कायम ठेवणे ,महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष ची निवड करणे, गाव विद्युत व्यवस्थापक निवडणे ,शांतता समितीची निवड करणे ,
या वरील विषयावर चर्चा करून ग्रामसभेची मान्यता घेणे गरजेचे असताना अध्यक्ष व उपसरपंच ताईचे प्रतिनिधी श्याम जाधव यांनी कट रुचून गावात आरोग्य शिबिराचे ग्रामपंचायत मध्ये आयोजित केले
व आरोग्य तपासणीसाठी आलेल्या नागरिकांच्या सह्या घेऊन सभा झाल्याचे खोटे विवरण दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही
या कारणाने आम्हा ग्रामस्थांची दिशाभूल करणे व ग्रामसभेला बोलावून अपमानित करणे व खोटे प्रोसिडिंग तयार करणे व परस्पर मासिक सभेत स्वतःच्या हिताचे ठराव पास करणे शासनाची दिशाभूल करणे ही बाब
अतिशय गंभीर असलेले ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम (39) (1 )अन्वे ग्रामपंचायत अध्यक्ष व उपसरपंच यांच्या कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे दिनांक 14 फेब्रुवारी रोजी कोठारे शिंदे येथे झाले
ग्रामसभा नसून ही आरोग्य शिबिर आहे असे असे मानण्यात यावे अशी मागणी निवेदनकर्त्याने केली
यावेळी निवेदन करत असताना बादल रमेश राठोड ,मनोज मधुकर राठोड, आकाश बाबू आडे,
विशाल दत्ता चव्हाण ,हेमंत अशोक नाईक, कुलदीप जयसिंग राठोड, ऋषिकेश दिनेश राठोड, दिनेश जाधव, अशोक उत्तम मेश्राम, सत्यम राठोड, मनोज राठोड,