Ticker

6/recent/ticker-posts

किनवट यांनी दिनांक 6 12 2022 रोजी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की आरोपींनी त्यांना आरोग्य खात्यात नोकरी लावून देतो याचे आमिष दाखवून खोटे नियुक्तीपत्र देऊन त्यांच्याकडून सात लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे .


फिर्यादी नामे सचिन मोहन जाधव वय 34 वर्ष राहणार गंगा नगर किनवट यांनी दिनांक 6 12 2022 रोजी  पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की आरोपींनी त्यांना आरोग्य खात्यात नोकरी लावून देतो 

याचे  आमिष दाखवून खोटे नियुक्तीपत्र देऊन त्यांच्याकडून सात लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे .

     वगैरे प्रकारच्या तक्रारीवरून आरोपी नामे 1. आनंदराव रामजी सोनकांबळे व्यवसाय सेवानिवृत्त वनपाल  2. राहुल आनंदराव सोनकांबळे व्यवसाय बेरोजगार दोन्ही रा सिंगरवाडी हल्ली मुक्काम लेक्चर 

कॉलनी गोकुंदा 3. सुरेश प्रकाश डोंगरे राहणार शिरपूर तालुका महागाव जिल्हा यवतमाळ व इतर यांचे विरुद्ध 

किनवट पोलीस स्टेशन येथे गु रजिस्टर नंबर 238 /22 भादवि कलम 420 468 471 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
    
 सदर गुन्ह्यात वरील तीनही आरोपी त्यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे. 

आरोपी यांनी किनवट तालुक्यामध्ये आरोग्य सेवक पदाची नोकरी लावण्याचे अमिष दाखवून बऱ्याच बेरोजगार  तरुणांना फसविले असल्याची माहिती मिळाली असून त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास वेगाने चालू आहे . 

वरील आरोपींना  दिनांक 6.2. 23 रोजी व दिनांक 7.2. 23 रोजी अटक करण्यात आली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे.


सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक भोकर ,माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट

 यांचे Nevertheless पोलीस निरीक्षक बोरसे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस कॉन्स्टेबल कांगणे ,पठाण यांनी केली आहे.