Ticker

6/recent/ticker-posts

किनवट( तालुका प्रतिनिधी) पत्रकारावरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा किनवटच्या वतीने


*शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध*

किनवट( तालुका प्रतिनिधी) पत्रकारावरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा किनवटच्या वतीने 

या घटनेचा तीव्र निषेध म्हणून व वर्तमान विदारक परिस्थितीपेक्षा सुरक्षित परिस्थिती निर्माण होण्यासाठी 

या घटनेचा तीव्र निषेध करून सहाय्यक जिल्हाधिकारी यांना दिनांक 9/2/2023 रोजी व तसेच आज दिनांक 10/ 2/ 2023 रोजी तहसील कार्यालय किनवट येथे पत्रकार बांधवांनी निवेदन दिले तसेच सर्व पत्रकार बांधवांनी काळ्याफिती लावून आपले कामकाज केले


सामाजिक मानवी जीवन सर्वांगीण सुंदर बनविण्यासाठी भूमिका घेणाऱ्या पत्रकाराचा आवाज कायमचा बंद केला जात असतो ही विदारक परिस्थिती व कायदा व सुव्यवस्थेचा होत असलेला बोजवारा यामुळे मनाला खिन्ह पाडणारी परिस्थिती याला स्वतःला "सज्जन" म्हणून घेणारा घटक ही तेवढाच जबाबदार आहे. म्हणून सज्जनाचा "शांतपणा" हा दुर्जनाच्या गुन्हेगारी कृतीपेक्षा भयानक धोकादायक असतो तसेच समाजातील सज्जन 

हा जागरूक असणे ही वर्तमान काळाची गरज आहे. सदर निवेदनात राजापूरचे शशिकांत वारीशे यांची हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध या विषयाला अनुसरून.


"सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणारा पत्रकारांना आवाज कायमचा बंद केला जातो. पत्रकार हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र 

या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये मितीची भावना निर्माण होत आहे.

महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हे सोमवारी कोंदवली 

येथून आपल्या दुचाकीने जातअसताना त्या वेळी भरधाव वेगाने येणान्या महेंद्रा थार गाडीने त्याच्या गाडीला धडक दिली. 

अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून 

त्यांचा मृत्यू झाला मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे. शशिकात ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. 


सकाळी पंढरीनाथ याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे.

 या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. 

तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करावा खटल्याची सुनावणी फास्ट (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे. 

राज्यातील पत्रकाराचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे पुरोगामी महाराष्ट्रा मध्ये हे शोभा देणारे नाही वारंवार  पत्रकारांवर होणारे हल्ले, 

त्यांच्यावर दाखल होणारे खोटे गुन्हे  दाखल होणारे थांबले नाही तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा गंभीर इशारा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत. 

गेल्या आठ दिवसात महाराष्ट्रात पत्रकारावर हल्ला होण्याच्या आठ घटना घडलेल्या आहेत

हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. 

अशी आमची विनंती आहे. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी मराठी पत्रकार परिषद संघ किनवट अध्यक्ष पत्रकार श्री सुधाकर रावजी कदम. 

जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार श्री फुलाजी गरड पाटील, पत्रकार के. मूर्ती, पत्रकार श्री किशनराव भोयर, 

पत्रकार श्री किरण ठाकरे, पत्रकार बालाजी शिरसाठ, पत्रकार विलास सुर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.