Ticker

6/recent/ticker-posts

कृषी उत्पन्न बाजार समितीतले भ्रष्टाचार चव्हाट्यावर..!दोषीवर गुन्हे दाखल करा - व्यंकटराव नेम्मानीवार किनवट = (तालुका प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीतला गैरव्यवहार पुन्हा चव्हाट्यावर आला असून तत्कालीन माजी सभापती अनिल कराळे


कृषी उत्पन्न बाजार समितीतले भ्रष्टाचार चव्हाट्यावर..!
दोषीवर गुन्हे दाखल करा - व्यंकटराव नेम्मानीवार 

किनवट = (तालुका प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीतला गैरव्यवहार पुन्हा चव्हाट्यावर आला असून तत्कालीन माजी सभापती अनिल कराळे 

यांच्या कार्यकाळातील नौकर भरती व नियमबाह्य आर्थिक व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार माझी नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व्यंकटराव नेम्मानीवार यांनी विभागीय सहनिबंधक लातूर 

यांना केल्यामुळे संबंधित वर्तुळात एकच खळबळ माजली असून तत्कालीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल पाटील कराळे

 यांचेवर चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणीही नेम्मानीवार यांनी केली आहे.
     
   याबाबत सविस्तर असे की, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट येथे दि. 31 डिसेंबर 2021 नंतर जी नौकर भरती करण्यात आली ती नियमबाह्य आर्थिक व्यवहारातून करण्यात आली असुन. 

ज्या पदभरतीमध्ये नेमणुका देण्यात आल्या त्यात नियमबाह्य भ्रष्टाचार झाला असून, त्यात तत्कालीन सभापती अनिल पाटील कराळे हे दोषी आहेत. 

असा लेखी आरोप तत्कालीन संचालक तथा माजी सभापती व्यंकटराव नेम्मानीवार यांनी केला असून आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमबाह्य प्रशासकाची ही नेमणूक करण्यात आली आहे. 

असाही आरोप करत सदर संस्थेत गत तीन वर्षापासून सभा न घेता, 

मान्यता न घेता अतोनात नियमबाह्य खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी सर्वांचा विश्वासघात केला आहे. 

सदर विषयी अनेक वेळा संबंधित वरिष्ठांना नांदेड, लातूर येथे तक्रारी केल्या होत्या, संबंधित वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी समिती ही गठीत केली होती, 

परंतु आपले भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडेल या भितीपोटी संबंधित सभापती कराळे 

यांनी यावर नियमबाह्य स्थगिती आणून आपली होणारी बदनामी व कार्यवाही टाळली. 

नियमबाह्य कृषी उत्पन्न बाजार समितीची नौकर भरती करण्यासाठी नियुक्त कर्मचारी यांचेकडून लाखो रुपये उखळून पदभरती करण्यात आली. 

असे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण त्यांच्या कार्यकाळात झाले आहे. त्यांचे सर्व रितसर पुरावे ही वेळप्रसंगी माझ्याकडे उपलब्ध आहेत. 

असा दावा व्यंकटराव नेम्मानीवार यांनी केला असून सदर गंभीर प्रकरणाची नियमबाह्य व भ्रष्ट प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कार्यवाही व्हावी. 

अशी तक्रार काँग्रेस नेते तथा माजी सभापती व्यंकटराव नेम्मानीवार यांनी केल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे भ्रष्टाचार प्रकरण गाजणार असे चित्र निर्माण झाले आहे.