किनवट - शहरातील सराफा व्यापारी श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार हत्याप्रकरणातील अखेरचा आरोपी विकास उर्फ विक्की कोल्हे याला पोलिसांनी शनिवारी (दि.२५) रात्री उशिरा यवतमात्ठ येथून अटक केली.कोल्हे याला किनवटच्या , दिवाणी न्यायालयाने २ दिवस , पोलीस कोठडी सुनावली आहे.
जमिनीच्या वादातून शहरातील .. सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार यांच्यावर दि.१२ डिसेंबर रोजी २०२२ रोजी संतोष कोल्हे व इतरांनी प्राणघातक हल्ला केला होता .
मृत्यूशी झुंज देताना कंचलवार यांचा दि.२७ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी व्यापारी व आर्यवैश्य समाजाने आरोपीच्या अटकेसाठी आक्रमक भूमिका घेतली होत
त्यानंतर पोलिसानी संतोष कोल्हेसह इतर चौघांवर गुन्हे दाखल केले. यापैकी तिघांना अटक झाली होती.
सदर प्रकरण हाताव्ठण्यात हयगय केल्याप्रकरणी आधी तत्कालीन पोलीस निरीक्षक अभिमन्यू साल्के
यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यानंतर पोलीस कर्मचारी गजानन चौधरी व सुनील कोलबुद्े यांचीही येथून उचलबांगडी करण्यात आली.
दरम्यान, डीवायएसपी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहायक
पोलीस निरिक्षक विशाल बाठोरे, फौजदार मिथून सावंत, पोलीस कर्मचारी प्रदीप आत्राम,
नांदेडच्या सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांच्यासह स्थानिकचे गजानन करे, संभाजी गौरकर, सय्यद सिराज
यांनी अखेरचा आरोपी विकास उर्फ विक्की अशोक कोल्हे याच्या अटकेसाठी प्रयत्न केले.
मिव्ठालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा विक्की कोल्हे याला पोलिसांनी यवतमात्ठ बसस्थानक परिसरातृन अटक केली.
रविवारी त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. अंबोरे यांच्या न््यायदालनात उभे केले असता, नया. अंबोरे