Ticker

6/recent/ticker-posts

नागढव यात्रेतील विजेता पहिलवान कै.गोविंदराव पाटील मुंडे स्मरणार्थ बक्षीसाने सन्मानितकिरवट (तालुका प्रतिनिधी) गत पंधरा वर्षापासून नागढव यात्रेतील कुस्ती स्पर्धेत पहिले विजेता ठरलेल्या पैलवानास बोधडी येथील राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी आमदार प्रदीप नाईकांचे खंदे समर्थक गजानन पाटील मुंडे यांचे वडील कै गोविंदराव पाटील मुंडे


नागढव यात्रेतील विजेता पहिलवान कै.गोविंदराव पाटील मुंडे स्मरणार्थ बक्षीसाने सन्मानित

किरवट (तालुका प्रतिनिधी) गत पंधरा वर्षापासून नागढव यात्रेतील कुस्ती स्पर्धेत पहिले विजेता ठरलेल्या पैलवानास बोधडी 

येथील राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी आमदार प्रदीप नाईकांचे खंदे समर्थक गजानन पाटील मुंडे यांचे वडील कै गोविंदराव पाटील मुंडे 

यांच्या स्मरणार्थ 15 हजाराचे पहिले बक्षीस विजेते ठरलेले हिंगोली येथील पहिलवान धुपेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

किनवट तालुक्यातील मौजे पेंदा येथील शिवरात्रीनिमित्त भरत असलेल्या नागढव यात्रा ही नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. 
त्यानिमित्त हजारो भाविक नागदेवाच्या दर्शनाला येत असतात. सदर यात्रेत कुस्तीचा फड रंगत असतो.

त्यासाठी मराठवाड्यातून कुस्तीगीर पैलवान येत असतात. कुस्ती स्पर्धेत पहिला विजेता पहिलवानासाठी बोधडी परिसरातील 

नामवंत व्यक्तिमत्व होऊन गेलेले स्वर्गीय गोविंदराव पाटील मुंडे यांच्या स्मरणार्थ पहिले बक्षीस गजानन पाटील मुंडे हे गत पंधरा वर्षापासून अविरत  देत आहेत. 

गजानन पाटील मुंडे यांचे चिरंजीव महेश मुंडे यांचे हस्ते विजेत्या पैलवानास बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
यावेळी अनेक मान्यवर तसेच हजारो प्रेक्षक उपस्थित होते.