Ticker

6/recent/ticker-posts

बेमुदत संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हा - गोपाल कन्नाकेजुनी पेन्शन या मुख्य मागणीसह कर्मचाऱ्यांच्या इतरही महत्वपूर्ण मागण्यासाठी राज्यातील सर्व विभागातील सरकारी निमसरकारी , शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या वतीने 14 मार्च 2023 पासुन बेमुदत संपाची घोषणा केली आहे.


बेमुदत संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हा - 
गोपाल कन्नाके

जुनी पेन्शन या मुख्य मागणीसह कर्मचाऱ्यांच्या इतरही महत्वपूर्ण मागण्यासाठी राज्यातील सर्व विभागातील  सरकारी निमसरकारी , शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या वतीने 14 मार्च 2023 पासुन  बेमुदत संपाची घोषणा केली आहे.

या मध्ये जुनी पेन्शन ही मुख्य मागणी  व इतर ही महत्वपूर्ण मागण्या मंजूर झाल्या शिवाय संप मागे घेतला जाणार नाही.असा ठोस पवित्रा संघटनेच्या अंतिम आढावा बैठकीत घेतल्याने 

या बेमुदत संपा मध्ये महाराष्ट्र राज्य  जुनी पेन्शन हक्क संघटना व इतर ही सर्व विभागाच्या सर्व संघटना मोठ्या ताकदीने सहभागी होणार आहे. 

तेंव्हा किनवट तालुक्यांतील सर्व कर्मचाऱ्यानी होऊ घातलेल्या या बेमुदत संपात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या न्याय मागण्यासाठी आपल्या एकजुटीची ताकद सरकारला दाखवून द्यावे.

असे आवाहन जुनी पेन्शन हक्क संघटना किनवटचे अध्यक्ष गोपाल कन्नाके यांनी केले.