Ticker

6/recent/ticker-posts

गोकुंदा ग्रामपंचायतची ग्रामसभा शासकीय विश्रामग्रहाच्या प्रांगणात पार पडली ग्रामसभेमध्ये गावातील विकास कामावर व सर्व प्रकारच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी 16 समित्या गठीत करावयाच्या होत्या परंतु महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरून मतदान प्रक्रिया पार पडत असताना कल्लोळ झाल्याने सरपंच तथा ग्रामसभेचे अध्यक्ष सौ अनुसया संजय शिडाम



गोकुंदा ग्रामपंचायतची ग्रामसभा शासकीय विश्रामग्रहाच्या प्रांगणात पार पडली ग्रामसभेमध्ये गावातील विकास कामावर व सर्व प्रकारच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी 16 समित्या गठीत करावयाच्या होत्या परंतु महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरून मतदान प्रक्रिया पार पडत असताना कल्लोळ झाल्याने सरपंच तथा ग्रामसभेचे अध्यक्ष सौ अनुसया संजय शिडाम 

यांनी सभा तहतूक केली.
गोकुंदा ग्रामपंचायत अंतर्गत कोरोनाच्या नंतर पहिल्यांदाच दिनांक 02/03/2023 रोजी ठीक 11.30 वाचता सरपंच सौ अनुसया संजय शिडाम यांच्या अध्यक्षतेखाली सभेला कोरम पूर्ण झाल्याने सभा सुरू करण्यात आली 

सचिव राजकुमार माळवे यांनी उपस्थित सर्व गावकऱ्यांना सभेमध्ये घेण्यात येणाऱ्या विषयाची सूची वाचून दाखवली 

त्यामध्ये 16 समितीचे गठन करावयाचे होते सात समितीचे गठन व्यवस्थित पार पडले होते आठवी समिती महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे गठन प्रक्रिया चालू असताना महिला कार्यकर्ते परवीन बेगम शेख खालील 

यांनी अध्यक्षाच्या परवानगीने सभेसमोर प्रत्येक वेळेस पुरुषाला संधी दिल्या जाते महिलांना यावेळेस प्रतिनिधित्व देण्यात यावे असे संबोधित केल्याने सभेतील महिलांचा उत्साह वाढला होता

 त्यामुळे सदर अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया राबवावी लागली मतदान प्रक्रिया चालू असताना सदर महिला विजयी होत असल्याचे दिसून येतात नियोजन करून सभेला उपस्थित झालेल्या ु

ढार्‍यांचे मनोबल खचत होते म्हणून सदर सभेमध्ये नियोजनबद्ध कल्लोळ निर्माण करण्यात आल्याने सभा अध्यक्ष यांना तहकूब करावी लागली परंतु कोरोनाच्या नंतर पहिलीच ग्रामसभा असल्याने सभेला जवळपास 400 च्या पार नागरिकांनी सहभाग नोंदीला होता उपस्थित आणि सभेला येण्यापूर्वी 

ज्या अशा मनात धरून सभेला उपस्थित झाले होते त्यांची मात्र निराशा झाली यादरम्यान बंदोबस्ताला असलेले पोलीस मात्र सर्व गोंधळ पाहिजे

 त्या पद्धतीने न हाताळल्यामुळे सदर ग्रामसभा अध्यक्ष यांना तहकूब करावी लागली अशी चर्चा सर्वात जास्त होत होती सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क केला 

असता सरपंच यांचा संपर्क होऊ शकला नाही ग्रामसेवक यांनी तहकूब झालेली ग्रामसभा पुन्हा घेण्यात येईल व त्या ग्रामसभेमध्ये नव्याने सर्व समितीचे कामकाज पार पाडण्यात येईल 

असे सांगितले वरील प्रकरणावरून गोकुंदा वासियांच्या नेहमीच आशाची निराशा झालेली आहे ग्रामपंचायत निर्मितीपासून एकदाही ग्रामसभा निर्विवाद पार पडली नाही हे गोकुंदा वाशीयांचे नशीबच म्हणावे लागेल यानंतरची ग्रामसभा ही निर्विवाद पार पाडावी यासाठी सरपंच तथा अध्यक्ष 

यांना शर्तीचे प्रयत्न करून महिला सरपंच सक्षम असल्याचे विरोधकांना दाखवावे लागेल एवढे मात्र निश्चित