किनवट तालुक्यातील इस्लापूर जलदरा बोधडी या मंडळात 17 ते 19 मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाक्यामुळे सुमारे 8 हजार हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी कापूस, गहू , ज्वारी, तीळ, हरभरा, यासह भाजीपाला पिके भुईसपाट झाली.
ज्या दिवशी पाऊस झाला तेव्हा देखील मी याच परिसरात होतो मात्र अधिकारी व कर्मचारी संपात असल्याने आणि रात्र देखील झाल्याने या गावांना भेट देऊ शकलो नाही,
आज सकाळीच परोटी तांडा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून भावना जाणून घेत तहसीलदार मॅडम,
मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती देत
शेती पिकाबरोबरच शेतकऱ्यांची जनावरे आणि घरांची झालेली पडझड आदींचे पंचनामे करून अहवाल शासनाला पाठविण्याचे निर्देश दिले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानी बरोबरच तातडीने 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली असून यासाठी मी स्वतः जातीने मंत्रालय स्तरावरून प्रयत्न करणार आहे.
यावेळी त्यांच्या समवेत दुधराम चव्हाण, रमेश पडवळ, जयसिंग चव्हाण, उमेश जाधव, परोटीतांड्याचे सरपंच संतोष आडे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.