*यशस्वी सापळा कार्यवाही*
➡ *युनिट :-* नांदेड
➡ *तक्रारदार :-* पुरुष, वय 56 वर्षे
➡ *आरोपी :-*
बालासाहेब नरोबा पांढरे, वय 56 वर्षे, व्यवसाय नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल/1805, पोलीस स्टेशन किनवट, जि. नांदेड रा. कमलाई नगर, हदगाव ता. हदगाव,जि. नांदेड
➡ *तक्रार प्राप्त:-
दि.18/03/2023
➡ *लाच मागणी पडताळणी:-*
दि.20/03/2023
➡ *लाच स्विकारली :-*
दि.20/03/2023
➡ *लाचेची मागणी रक्कम:-* रु.10,000/-
➡ *स्विकारली रक्कम :-* रु.3,000/-
➡ *थोडक्यात हकिकत:-*
तक्रारदार, त्यांची पत्नी व दोन मुलांविरुध्द पोलीस स्टेशन किनवट येथे भारतीय दंड संहिता कलम 324,323,504,506,34 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात आरोपींना अटक न करता नोटीस देऊन सोडून दिले म्हणुन व यापुढे गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना रु. 10,000/- लाचेची मागणी करून रु. 5,000/- रु यापूर्वीच स्विकारले व उर्वरित रु. 5,000/- आज रोजी घेऊन येण्याचे सांगितले होते. आज रोजी लाचमागणी पडताळणी दरम्यान यापूर्वी रु. 5,000/- घेतल्याचे मान्य करून उर्वरित रु. 5,000/- पैकी तडजोडीअंती रु. 3,000/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
उपरोक्त लाचेची रक्कम रु. 3,000/- सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.
आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन किनवट जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
➡ मार्गदर्शक:-
डॉ राजकुमार शिंदे
पोलीस अधिक्षक,
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.
➡ पर्यवेक्षण अधिकारी:-
श्री राजेंद्र पाटील,
पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड.
➡ सापळा/तपास अधिकारी :-
श्री. नानासाहेब कदम,
पोलीस निरीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड.
➡ सापळा कारवाई पथक:-
पोहेकॉ संतोष वच्चेवार, सचिन गायकवाड, पोकॉ अरशद खान, चापोना मारोती सोनटक्के अँटी करप्शन ब्युरो, यूनिट नांदेड.
----------------------
*नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.
मोबाईल क्रमांक 9623999944
श्री राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड.
मोबाईल क्रमांक - 7350197197
*कार्यालय दुरध्वनी - 02262-253512*