Ticker

6/recent/ticker-posts

फिर्यादी, जात कोलाम, राहणार सोनापूर तालुका किनवट यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की7.3.2023 रोजी त्यांची मुलगी वय १४ व बहिणीची मुलगी वय बारा वर्षे अशा दोघी त्यांच्या घराचे जवळच असणाऱ्या आरोपीचे शेतामधील विहिरीवर पाणी भरण्यास गेल्या असता आरोपीने फिर्यादीचे मुलीचा हात पकडून विनयभंग केला


 फिर्यादी, जात कोलाम, राहणार सोनापूर तालुका किनवट यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की7.3.2023 रोजी

 त्यांची  मुलगी  वय १४ व बहिणीची मुलगी  वय बारा वर्षे अशा दोघी त्यांच्या घराचे जवळच असणाऱ्या आरोपीचे शेतामधील विहिरीवर पाणी भरण्यास गेल्या असता आरोपीने फिर्यादीचे मुलीचा हात पकडून विनयभंग केला. 

दोन्ही मुली पाणी आणण्यासाठी नेलेले गुंड तेथेच टाकून घरी पळून आल्या.फिर्यादी ही विहिरीवरील गुंड परत आणण्यासाठी गेली असता

 आरोपी पुन्हा फिर्यादीचे घरासमोर येऊन तिला जातीवाचक शिवीगाळ करून दगड फेकून मारून दमदाटी करून निघून गेला. 
    

  दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सुमारास आरोपी पुन्हा फिर्यादीचे घरासमोर जाऊन तुम्ही पोलिसात तक्रार दिली तर तुम्हा नवरा बायकोला पाहून घेतो. 

तुमच्या मुली शाळेत जातात हे लक्षात ठेवा असे म्हणून दम दिला वगैरे मजकुराची तक्रार देऊन 

किनवट पोलीस स्टेशन येथे गुर न 63/ 23 भादवि कलम 354 336 504 506 तसेच पोस्को कायदा कलम 8 ,12 व ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
      
गुन्ह्याचा पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट हे करीत आहे