Ticker

6/recent/ticker-posts

*सार्वजनिक रस्त्यावर सुरु असलेले अतिक्रमण हटवा* – अनिल राठोड _गट विकास अधिकारी, सरपंच ग्रामसेवकांना निवेदन_


*सार्वजनिक रस्त्यावर सुरु असलेले अतिक्रमण हटवा* – अनिल राठोड

 _गट विकास अधिकारी, सरपंच ग्रामसेवकांना निवेदन_ 

माहूर- तालुका प्रतिनिधी चव्हाण

  लखमापूर गट ग्रामपंचायत ता. माहूर अंतर्गत जगु नाईक तांडा येथे ग्रामपंचायत  मालकीच्या सार्वजनिक रस्त्यावर  अतिक्रमण करण्यात येत असल्याने सदर अतिक्रमण तात्काळ हटवून 

अतिक्रमणधारकाच्या घरकुलाची पुढील प्रक्रिया थांबवून त्याचे विरुद्ध कारवाई करून 

ग्रा.प. मालकीचा सार्वजनिक रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी अनिल मोतीराम राठोड यांनी गटविकास अधिकारी, 

सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.   

सविस्तर वृत्त असे की, जगू नाईक तांडा येथे   काही व्यक्ती   ग्रामपंचायत मालकीच्या  नुकतेच सीसी रोड बांधकाम झालेल्या सार्वजनिक रस्त्यावर पंतप्रधान अवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले घरकुल बांधकाम अतिक्रमण केलेल्या जागेवर घराचे बांधकाम करीत आहे. 

ग्रामपंचायत मालकीच्या सार्वजनिक रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण तात्काळ रोखण्यात यावे व  अतिक्रमण धारकांचे घरकुल लाभाची पुढील प्रक्रिया थांबवून  

त्यांचे विरुद्ध योग्य ती कारवाई करून ग्रामपंचायत मालकीचा सार्वजनिक रस्ता अतिक्रमण मुक्त करून देण्याची मागणी अनिल मोतीराम राठोड यांनी केली आहे.