Ticker

6/recent/ticker-posts

अवैध वृक्षतोड लपवण्यासाठीच माहुर वनविभागाचा काळा पराक्रम ?तेल्या माळ जळून खाककिनवट (तालुका प्रतिनिधी) माहूर वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या हिंगणी परिसरातील तेल्या माळाला आग लागून अंदाज चाळीस हेक्टर जंगल जळून खाक

अवैध वृक्षतोड लपवण्यासाठीच माहुर वनविभागाचा काळा पराक्रम ?
तेल्या माळ जळून खाक

किनवट (तालुका प्रतिनिधी) माहूर वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या हिंगणी परिसरातील तेल्या माळाला आग लागून अंदाज चाळीस हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचा गंभीर प्रकार घडला असून त्यात शेकडो वन्यजीव,पक्षी , सर्प सरपटणारे वन्य जीव, 

मूल्यवान वनऔषधी नष्ट झाल्याचे विश्वासनीय वृत्त हाती आले आहे.

याबाबत माहूर वनपरक्षेत्र कार्यालयातील संबंधित अधिकारी,कर्मचारी,यांना या गंभीर घटनेबद्दल काहीच पर्वा नसल्याचे चित्र दिसत आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, जंगलातील मौल्यवान सागवान जातीचे झाडे  तस्करामार्फत अवैद्यरित्या  तोडून काळ्याबाजारात  बाजारात विक्री केल्याचे वृत्त असून ते झालेली तूट, झाडाची बुडे नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक जंगलाला आग लावून नष्टकेल्याचे विश्वसनी व्रत आहे. 

तरी याबाबतीचे गांभीर्य घेऊन वनविभागाच्या वरिष्ठाने जाय मोक्यावर जाऊन सदर परिस्थिती जाणून घ्यावी अशी ही मागणी वनप्रेमी करीत असून शासनाने नेमलेले वनविभागाचे कर्मचारी रक्षकच भक्षक बनत असल्याचे चित्र डोळ्यासमोर येत आहे.

संबंधित विभागाचे मात्र या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वन्यप्रेमी मंडळीकडून होत आहे.माहूर तालुक्यातील हा जंगल सागवान लाकडासाठी प्रसिद्ध असून इतर राज्यातील लोक या जंगलातील लाकूड घेऊन जाण्यासाठी

 किनवट व माहूर तालुक्यात येत असतात. माहूरवनपरीक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या हिंगणी परिसरातील हा तेल्या माळ असून तेथे शेकडो सरपटणारे प्राणी, वन्यजीव जळून खाक झाल्याची बाब उघड होत आहे. 

याच पद्धतीने जर जंगल नष्ट होत राहिला तर अजून पाच वर्षे असाच प्रकार चालू राहिला तर माहूर तालुक्यातील जंगल आणि वनसंपदा ही नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.

 माहूर तालुक्यातील जनतेला मात्र उजाड डोंगराचा सामना करावा लागेल.सदरील जंगलात लागलेली आग विजवण्यासाठी संबंधित कोणत्याही वन विभागातील कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकार्‍यांनी प्रयत्न केले नसल्याचे परिसरातील जनता बोलत आहे. 

जर अचानक आग लागली असेल तर त्यांना ही आग विझवता आली नसती काय ? असाही प्रश्न समोर येत असून सदर जंगलातील अवैद्य सागवान झाडाची कत्तल उघडकीस येऊ नये म्हणून सदर आग आटोक्यात आणली नाही, असाही आरोप वनप्रेमी करीत आहेत. 

तरी संबंधित वरिष्ठ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जायमोक्यावर येऊन प्रत्यक्ष तपासणी करून चौकशी करावी आणि संबंधित जबाबदार वनाधिकारी व कर्मचाऱ्यावर तात्काळ गंभीर कार्यवाही करावी,

 अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.