Ticker

6/recent/ticker-posts

किनवट इस्लापूर बोधडी व मांडवी तालुके करून किनवटला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी किनवटवासीयांची मागणी आहे


किनवट प्रतिनिधी
 इस्लापूर बोधडी व मांडवी तालुके करून किनवटला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी किनवटवासीयांची मागणी आहे 

या संदर्भात   सरकार उदासीन असल्यामुळे जिल्हा निर्मिती रखडल्याचा आरोप करत तालुक्याची  लोकसंख्या, भोगोलिक क्षेत्रफळ लक्षात घेता शासनाने किनवटला जिल्हा म्हणून घोषित करावे 

या प्रमुख मागणीसाठी किनवट जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने 17 मार्च रोजी

 तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदारामार्फत दिले आहे 

निवेदनात म्हटले आहे की किनवट हा तालुका आदिवासी उपाययोजना लागू असलेला मराठवाड्यातील एकमेव तालुका आहे.

या तालुक्यात आदिवासी बंजारा व इतर मागासवर्गीय समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. 

जिल्ह्यापासून किनवटचे अंतर 200 किलोमीटर पेक्षा अधिक असून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय,सार्वजनिक बांधकाम कार्यालय,

जिल्हा रुग्णालय अशा महत्त्वाच्या कार्यालयातील  कामासाठी येथील गोरगरिबांना 200 किलोमीटरचे अंतराचा प्रवास करावा लागतो. 

जिल्हा निर्मितीच्या निकषात किनवट तालुका  परिपूर्ण असून येथील भौगोलिक क्षेत्रफळ, शासकीय निम्मंशासकीय कार्यालय, बाजारपेठ लक्षात घेता

 किनवट जिल्हा निर्मिती होणे आवश्यक आहे.मागील 25 ते 30 वर्षापासून किनवट जिल्हा निर्मितीची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. 

किनवट जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने मागील कित्येक वर्षांपासून निवेदने देऊन वेगवेगळे प्रकारचे आंदोलन करून पाठपुरावा करत आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

आदिवासी,दुर्गम,मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवटला जिल्हा करण्यास सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत जनभावना लक्षात घेऊन

 इस्लापूर बोधडी व मांडवी गावांना  तालुके तर किनवटला जिल्हा करावे 
या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  17 मार्च 2023 रोजी 

येथील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष नामदेवराव केशवे व अध्यक्ष व्यंकटराव नेमानिवार यांनी दिला आहे