Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द केल्याबद्दल काळ्या फिती बांधून निषेधपर निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना सादरकिनवट ता.प्रतिनिधी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द केल्याबद्दल निषेध नोंदवत असल्याबाबत किनवट काँग्रेस पार्टी कडून


काँग्रेस नेते  राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द केल्याबद्दल काळ्या फिती बांधून निषेधपर निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना सादर

किनवट ता.प्रतिनिधी:  काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द केल्याबद्दल निषेध नोंदवत असल्याबाबत किनवट काँग्रेस पार्टी कडून किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी  यांच्यातर्फे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मु यांना निवेदन पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे.


याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या हाताला काळी रिबीन बांधून केंद्र शासनाचा निषेध नोंदवत येथील सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांना सादर करण्यात आले.
 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या किनवट तालुका कार्यकारणी कडून आमचे नेते राहुल गांधी

 यांची संसदीय सदस्यता रद्द केल्याच्या निर्णयाविरुद्ध निषेध नोंदवत असून देशात विरोधी पक्षातील नेत्यांना डावलून त्यांचे हनन करण्याचे प्रकार चालू आहेत. हे देशाच्या लोकशाही करिता अत्यंत घातक आहे.
   
अशा प्रकारच्या कृतीमुळे आपला देश आपण हुकुमशाहीच्या खाईमध्ये लोटत जात असल्याचे स्पष्ट निदर्शनात येत आहे.
  
  तरी आपल्या माध्यमातून आम्ही देशाच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मुजी यांच्याकडे आमचे निवेदन पाठवत असून याप्रकरणी देशांमध्ये लोकशाही टिकून ठेवण्याकरिता

 त्यांनी सदर प्रकरणात गांभीर्याने दखल घेऊन आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून देशातील विविध संस्थांना या संदर्भात स्पष्टीकरण मागून आमचे नेते राहुल गांधी 

यांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा देशाची लोकशाही टिकवण्याकरिता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अखेरच्या श्वासापर्यंत याविरुद्ध तीव्र आंदोलन लोकशाही स्थापित करण्याकरिता करत राहतील.

असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष के.सूर्यकांत रेड्डी,माजी नगराध्यक्ष के मूर्ती, महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी सुरेंद्र घोडजकर, जाफर चिखलीकर,

 आनंद भालेराव, नारायण दराडे ,सुरेश सोळंके पाटील, अभय महाजन, इमरान खान, सुभाष बाबू राठोड, संतोष अडकिने पाटील, 

माधव खेडकर,समशेर खिच्ची, स्वामी नूतपेलीवार,डॉक्टर तोफिक खान, अ. खलीद, फारुख बाबा, दिलीप पाटील, संदीप निखाते, प्रीती मुनेश्वर, शहनाज शेख शम्मू 

,वसंत राठोड, संजय कोतुरवार, शादुल्ला शेख अहमद, उत्तम राठोड, जवाद आलम, अन्वर भाई, फारुख चव्हाण, गंगाधर मुनेश्वर, लक्ष्मीपती दोनपेल्लेवार,

 गजानन जाधव अनुप देशमुख, बिलाल बडगुजर, इशरत शेख हसन, सुभाष बाभुळकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.