Ticker

6/recent/ticker-posts

सार्वजनिक पाणंद रस्त्यावर अतिक्रमण तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करा..राजू सुरोशेकिनवट (तालुका प्रतिनिधी) दिवासोन दिवस प्लॉट चे भाव गगनाला भिडत असताना व ग्रामपंचायत


सार्वजनिक पाणंद रस्त्यावर अतिक्रमण तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक  यांच्यावर गुन्हा दाखल करा..
राजू सुरोशे


किनवट (तालुका प्रतिनिधी) दिवासोन दिवस प्लॉट चे भाव गगनाला भिडत असताना व ग्रामपंचायत निवडणूक खर्च सुधा वाढत असताना लोकप्रतिनिधी सदर खर्च काढण्यासाठी ज्या बाबीतून पैसे कमवण्यास मिळेल त्या बाबीतून पैसा कमावण्याचा प्रयत्न करत आहेत 

राजकारण ही सेवा आहे ही मनातील भावना तेव्हाच लोकप्रतिनिधीच्या मनातून निघून गेलेली आहे आता फक्त राजकारणी हे पैसे कमवण्यासाठीच राजकारणात येत आहेत 

त्यामुळे गलिच्छ असे राजकारणाची प्रतिमा निर्माण होत आहे ही प्रतिमा निर्माण होऊ न देणे हे मोजे घोटी येथील सर्व सज्जन नागरिकांचे काम आहे या प्रवृत्तीला वेळीच रोखणे गरजेचे आहे

 त्याच प्रवृत्तीचा एक भाग म्हणून तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून प्लॉटिंग पाडून 

त्यांनी पैसा कमवला म्हणून वर्तमान उपसरपंच श्री राजू सुरोशे यांनी सन्माननीय तहसीलदार यांच्याकडे खालील विषयाच्या अनुषंगाने

विषय : "सार्वजनिक पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करुन तत्कालीन सरपंच बालाजी प्रल्हाद पावडे,

 ग्रामसेवक संदीप अंभोरे व अशोक किष्टन्ना सिरमनवार शेतमालक यांनी प्लॉटींग करुन संगणमताने विक्री केली आहे.

 तरी त्यांच्यावर शासनाची जमीन हडप केल्याबद्दल त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा".
महोदय,

वरील विषयास अनुसरुन विनंती अर्ज सादर करतो की, मौजे घोटी ग्रामपंचायतचा पाणंद रात सर्व्हे नं. 154 मधून 40 फुटाचा रस्ता घोटी वरुन सिरमेटी येथे जाण्यासाठी स्थित होता. 

परंतू तत्कालीन सरपंच बालाजी प्रल्हाद पावडे, तत्कालीन ग्रामसेवक संदीप अंभोरे व शेत जमीन मालक अशोक सिरमनवार 

यांनी संगनमत करुन पाणंद रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करुन स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी प्लॉट विक्री केली आहे व ते प्लॉट खालील तक्त्या प्रमाणे त्या व्यक्तीच्या नावे करुन दिले आहेत. 

तसेच ग्रामपंचायत घोटी येथील नमुना नं. 8 वर सूध्दा अनाधिकृतपणे सदर जागेची नोंद केली आहे.

तरी मे. साहेबांना माझी नम्र विनंती आहे की, स्वतःच्या आर्थिक फायदा करुन घेवून ग्रामपंचायतीची मालमत्ता विक्री केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच बालाजी प्रल्हाद पावडे,
 
तत्कालीन ग्रामसेवक संदीप अंभोरे व पाणंद रस्त्याच्या शेजारी असलेले शेत मालक अशोक किष्टन्ना सिरमणवार यांच्यावर शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा 

व घोटी ते सिरमेटी जाणारा पाणंद रस्ता खुला करुन देण्यात यावा ही नम्र विनंती. 
अशा प्रकारची तक्रार दाखल केलेली आहे 

सदर तक्रार ची दखल प्रशासन कितपत घेते हे येणारा काळच ठरवेल वर्तमान राजकारणी सुद्धा भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे कमावू नये तसेच भूतकाळातील झालेला भ्रष्टाचार हा सध्या राजू सुरवसे काढण्याचा प्रयत्न करीत आहेत

 त्यांच्याकडे संपूर्ण मौजे घोटी वासी यांचा जन पाठिंबा आहे त्यामुळे लवकरच झालेला घोटाळा बाहेर निघेल व वर्तमान लोकप्रतिनिधी सुद्धा घोटाळा किंवा भ्रष्टाचार करणार नाहीत याची दखल राजू सुरोशे घेत आहेत