Ticker

6/recent/ticker-posts

*महावितरण कडून नागरिकांची कुचंबणा*सकाळी 10 ते 5 वीज पुरवठा खंडित होणार असे सांगून सकाळी 9 ते सायंकाळचे 6.20 झाले तरी वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांना अतोनात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.


महावितरण कडून नागरिकांची कुचंबणा

सकाळी 10 ते 5 वीज पुरवठा खंडित होणार असे सांगून सकाळी 9 ते सायंकाळचे 6.20 झाले तरी वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांना अतोनात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

आणि त्यात कहर म्हणजे आदल्या दिवशी रात्री वीजपुरवठा पूर्णपणे खंडित होता त्यामुळे नागरिकांना उपाययोजना करण्यास वेळ मिळाला नाही तर आता नागरिकांची उपकरणे, 

मोबाईल, इन्व्हर्टर देखील हळूहळू बंद पडू लागली आहेत. 


आधीच प्रचंड उकाड्याने हैराण असलेले नागरिक व रमजान निमित्त उपवास करत असलेले नागरिक या महावितरणच्या गैरकारभारामुळे कमालीचे हैराण झालेले आहेत. 

राज्यात उष्णतेसंदर्भात येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला असून नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरण्यास जाऊ नका असे आवाहन करण्यात आलेले आहेत तरी वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिक घरी देखील बसू शकत नाही. 


या सर्व विदारक परिस्थिती संदर्भात बोलण्यात कोणत्याही प्रकारची राजकीय इच्छाशक्ती तयार नसल्याने, आलेल्या भयंकर परिस्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे..!