किनवट नगर परिषद निवडणुकीत एकूण 21 सदस्य निवडून येतील त्या पैकी 12 सदस्य खुल्या प्रवर्गातून , 3 सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातून तर 1 सर्वसाधारण सदस्य (महिला किंवा पुरुष)
अनुसूचित जमाती प्रवर्गातून तर राज्य मागास आयोगाने
इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना(ओबीसी) आरक्षण बहाल केल्याने ओबीसी प्रवर्गातून 5 सदस्य
त्यातील 2 महिला करिता आरक्षित राहतील. विभागीय आयुक्तांनी दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी काढलेल्या
या पत्रामुळे शहरातील विविध कट्ट्यावर पुन्हा नगर परिषद निवडणुकींच्या चर्चांना उधाण येणार आहे