भारत जोड़ो युवा अकादमी , साने गुरुजी रुग्णालय परिवारा तर्फे मागील 23 तारखे पासून, राष्ट्र सेवा दलाचे, विज्ञान, साहस व चंद्र शिविर; kinwat - नांदेड रोडवरील एमआयडीसी कोठारी येथे नियोजित साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आयोजित केल्या गेले आहे .
या शिबिरात किनवट व परिसरातील 90 शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला असून त्यात तीस मुली व 60 मुलांचा समावेश आहे .
वर्ग सहावी ते दहावी असा हा संस्कारक्षम वयोगट असून या शिबिरात आनंद घेण्यासाठी व नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी ते सहभागी झाले आहेत .
या शिबिरार्थींची विनामूल्य सात दिवसाची निवास व भोजनाची सोय आयोजकांनी केली आहे . या शिबिरात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुणे व कोल्हापूर वरून प्रशिक्षक दाखल झाले असून अनेक तज्ञ मंडळी मार्गदर्शन करीत आहेत.
या शिबिराचे उद्घाटन दिनांक 23 रोजी नांदेड येथील राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांचे हस्ते,
महिला प्रमुख डॉक्टर योगिनी शिंदे व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे समन्वयक डॉक्टर बालाजी कोम्पलवार यांच्या उपस्थितीत पार पडले अध्यक्ष स्थानी श्रीमती पुष्पाताई कोकीळ नांदेड ह्या होत्या .
या शिबिराची महती व प्रास्ताविक साने गुरुजी रुग्णालय परिवाराचे प्रमुख डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी केले
या शिबिरात रोज सकाळी मैदानी खेळ, लेझीम , झांज , मानवी मनोरे,
एरोबिक्स इत्यादी होत असून दिवसभरात एका तासाच्या बौद्धिकासह विज्ञान, छंद व साहसा वर आधारित कृती सत्र आयोजित केली जातात.
आज दिनांक 27 रोजी 27 एप्रिल रोजी सकाळी "पर्यावरण रक्षणासाठी जंगलाचे महत्त्व"
या विषयावर पैनगंगा अभयारण्यातील कोर्टा बीटचे प्रमुख श्री विनायक खैरनार साहेब यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले .