राष्ट्रीय महामार्गाच्या गौण खनिजाची शारदा कन्स्ट्रक्शन कडून चोरी
तात्काळ गुन्हे दाखल करा - व्यंकटराव नेम्मानीवार
किनवट = (तालुका प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या शारदा कन्स्ट्रक्शनकडून रोड खोदकामातील शासकीय मुरूम व माती नव्याने सुरू होत
असलेल्या पेट्रोल पंपावर व काही खाजगी नवीन घर बांधकामासाठी सदरील मुरूम व माती 5000 रु. प्रति ट्रक प्रमाणे विक्री करत असल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार
यांनी तहसीलदार व संबंधित वरिष्ठांना लेखी तक्रार केली असून तात्काळ यांचेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या किनवट शहरातील आयप्पा स्वामी मंदिर ते बस स्टँड जवळील रोडचे काम चालू आहे.
तेही निकृष्ट दर्जाचे आणि संतगतीने, सिमेंट कामावर पाणी क्युरिंग बरोबर न करता बोगस करण्यात येत असून,
रोड खोदकाम करून जी मुरूम व माती निघालेली शेकडो ट्रक खाजगी व्यक्तींना विकत असल्यामुळे शासनाच्या मालमत्तेची चोरी होत आहे.
याकडे कुणाचेही लक्ष नसून खुले आम सदर निघालेला गौण खनिज काळ्या बाजारात विक्री होत आहे. याची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि संबंधित एजन्सीवर गुन्हे दाखल करण्यात यावे
अशा आशयाचे लेखी निवेदन काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार यांनी महसूल विभागाला दिले आहे.