महावितरणमध्ये काम करून देखील पगार मिळत नसल्याने ठेकेदाराविरोधात उपोषण
प्रतिनिधी -
बाहय सत्रोत तंत्रज्ञ पदावर(कंत्राटी स्वरूपात) काम करून देखील चार महिन्याचे वेतन मिळत नसल्याने प्रयाय मार्ग म्हणून उपोषणाला बसल्याची वेळ आली आहे.
गेल्या काही महिन्यापसून महावितरणमध्ये बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ या पदावर काम करून सुद्धा कामाचे वेतन मिळत नाही आहे.
मुजीब मैनोद्दीन शेख, राहणार किनवट
यांनी वारंवार निवेदन देवून महावितरण कंपनीला वेतन मिळावी म्हणून विनंती केली.
वेतन तर मिळालीच नाही पण कामावरून देखील कमी करण्यात आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला दिले.
एजन्सीने कामावरून परस्पर कमी करून टाकल्या बाबत, सदर बाबतीत न्याय न मिळाल्यामुळे व्यवस्थापण कंत्राटदार
यांच्या विरोधात निराशेच्या भावनेतून तारीख 24 एप्रिल सोमवार रोजी पासून न्याय मिळे पर्यंत विद्युत भवन परिमंडळ कार्यालय नांदेड समोर उपोषणाला बसनार आहेत.