डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छञपती संभाजी नगरमध्ये “स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठाण"तर्फे अल्पोहाराची उत्तम व्यवस्था.
१४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीदिनी "स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान"तर्फे छञपती संभाजी नगर मधील भडकल गेट येथे डॉ.बाबासाहेबानां अभिवादनासाठी
येणाऱ्या सर्व भिमअनुयायी व नागरिकांसाठी मिठाई, आल्पोहार व पिण्याच्या पाण्याचे बॉटल वाटप व बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
स्वातंत्र्य सेनानी तथा दलीत मित्र पुरस्कार प्राप्त स्व.भाऊसाहेब शिवराम मोरे हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जे निष्ठावंत अनुयायी,
सहकारी लाभले त्यातील एक महत्वाचे सहकारी होते व मराठवाडा केसरी म्हणून भाऊसाहेब यांची ओळख होती.
त्यांनी दलितोद्धाराची चळवळ मराठवाड्यात खेडोपाडी नेऊन जनजागृती केली मराठवाड्यात दलीत परिषद आयोजन करून मराठवाड्यात रणशिंग फुंकले.
त्यावेळी निजामाकडून आपल्याला धोका होता ते त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या निजामाचा धोका ओळखून त्यांना ठाम विरोध केला त्यामुळे त्यांना हैद्राबाद स्टेटमध्ये सभा घेण्यास बंदी घालण्यात आली परंतु मक्रनपुर ता.कन्नड हे ठिकाण तेव्हा मराठवाड्याच्या सीमेवर खांदेशात होते.
३० डिसेंबर १९३८ रोजी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या प्रमुख उपस्थितीत मक्रणापुरला सभा झाली.ही सभा म्हणजे मराठवाड्याच्या आधूनिकिरणाची नांदी होती,
शैक्षणिक सोबत सामाजिक क्रांतीचे नवी दिशा होती.याच मक्रणापुर परिषेदेत भाऊसाहेब मोरे
यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या उपस्थितीतीत जनसमोदायासमोर "जयभीम" अभिवादन सर्वप्रथम उद्द्घोष केला.आज भाऊसाहेब मोरे आपल्यात नाहीत
परंतु तेव्हापासून ३० डिसेंबर ला मक्रनापुर येथे स्मरणार्थ विविध कार्यक्रम घेतले जातात व दरवर्षी १४ एप्रिल ला छ.संभाजीनगर भडकल गेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भिमअनुयायी
यांच्या सेवेसाठी *बि.एस.मोरे प्रतिष्ठान* च्यावतीने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब मोरे यांचे वारसदार प्रवीणजी मोरे
(पोलीस निरीक्षक) प्रतिष्ठानचे अध्यक्ष आयुष्यमती कीर्ती मोरे,जगदीश मोरे,जावई अभय उभाळे,सुशील मस्के,माधुरी मोरे, निलिमा मोरे,
आनंद मोरे परिवाराकडून मिठाई,नाष्टा,पाणी बॉटल ची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
यावेळी या स्वागत मंचास मा. केंद्रीय मंत्री भागवतजी कराड, पालकमंत्री मा. संदिपानजी भुमरे,
सहकार मंत्री मा. अतुलजी सावे, आमदार मा. संजयजी शिरसाठ, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे,
बाबुरावजी कदम,मा. ओबेरॉयजी, मा.राजूजी शिंदे, सं. खंडाळकर,
विविध संघटनाचे पदाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माधवराव निलावाड, रमेश छबीलवाड,
राजुभाऊ सिलमवार,ॲड.ओम तोटावार, कृष्णा बनकर, घाटीचे प्रशासकीय अधिकारी गोधने सर आदी