Ticker

6/recent/ticker-posts

सिंदगी (मो) ता.किनवट जि.नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र,उभारा:- बबन वानखेडे (भा. ज. पा. उपाध्यक्ष) किनवट (तालुका प्रतिनिधी) जनसामान्यांच्या हितासाठी प्रशासनाची मदत घेणारे राजकारणी एक दिवस फार मोठे नेते होऊन जातात व ते सत्तेवर असताना त्यांच्या काळातील जनसामान्य हा सुखी असतो


सिंदगी (मो) ता.किनवट जि.नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र,उभारा:- बबन वानखेडे (भा. ज. पा. उपाध्यक्ष) 

किनवट (तालुका प्रतिनिधी) जनसामान्यांच्या हितासाठी प्रशासनाची मदत घेणारे राजकारणी एक दिवस फार मोठे नेते होऊन जातात व ते सत्तेवर असताना त्यांच्या काळातील जनसामान्य हा सुखी असतो. त्याप्रमाणेच "कोरोना" सारख्या महामारीने संपूर्ण जगाला हा संदेश दिलेला आहे 

की आरोग्य सुविधेचा अभाव असल्यास त्या ठिकाणी मानवी मृत्यूचा तांडव हा होणारच हा संदेश कोविड 19 ने संपूर्ण जगाला किंबहुना देशाला ही दिलेला आहे म्हणूनच की काय जागतिक पातळीवर किंबहुना देश पातळीवर सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी शासन हे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत

 परंतु मौजे सिंदगी (मो) तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे अजूनही आरोग्य सुविधा ही पोहोचलेली नाही त्यामुळेच युवा राजकीय नेतृत्व श्री बबन वानखेडे भाजपा उपाध्यक्ष

 यांनी या प्रश्नाला सोडवण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय येथे धाव घेऊन किनवट तालुक्यातील  सिंदगी (मो)वा परिसरातील लोकांच्या व्यथा मांडल्या व आरोग्य सुविधा या   पोहोचल्या पाहिजे यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत

 त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून श्री बबन वानखेडे यांनी दिनांक 28/02/2023 माननीय उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात अति दुर्गम भागात असणाऱ्या पेसा कार्यक्षेत्रातील सिंदगी (मो) 

ता.किनवट जि.नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच आजूबाजूच्या 15 गावांसाठी आरोग्य उपकेंद्र, आशा वर्कर आणि 108 रुग्णवाहिका मंजूर करण्यासाठी विनंती केलेली आहे


या निवेदनात महाराष्ट्र राज्याचे आणि मागासलेल्या मराठवाडा विभागातील अगदी शेवटचे टोक असणाऱ्या आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त तालुका असणाऱ्या आमच्या 

किनवट तालुक्यात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आरोग्य सेवा आमच्या सिंदगी (मो) भागात पोहोचलेलीच नाही. तालुक्याच्या ठिकाणापासून आमचा भाग डोंगर दऱ्यामध्ये विखूरलेला असून आमच्या गावापासून तालुक्याचे ठिकाण 27 कि.मी. असून आमच्या भागातील कोणत्याही रुग्णांना, 

गरोदर मातांना 27 कि.मी. चा फेरा करून घाट माथा पार करत एक तर राजगड प्रा. आ. केंद्रात जावे लागते तेथेही डॉक्टर मिळत नसल्याने तिथून पुन्हा 20 कि.मी. चा प्रवासा करत तालुक्याच्या 

ठिकाणी असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात येऊन आरोग्य सेवा मिळवाव्या लागत आहेत. त्यामुळे रुग्णांची गरोदर मातांची प्रचंड हेळसांड होत आहे. 

किती तरी गरोदर मातांची प्रसुती एक तर रस्त्यातच झाली आहे किंवा कितीतरी नवजात शिशुंना आरोग्य सेवे अभावी आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच किती तरी वयोवृद्धांना आरोग्य सेवे अभावी प्राण गमवावे लागले आहेत.


तरी सदरील प्रकरणी आपण व्यक्तीशः लक्ष देऊन आमच्या अति मागासलेल्या भागात सिंदगी प्रा.आ.केंद्र, आजूबाजूच्या 15 गावांसाठी आ. उपकेंद्र, आशा वर्कर, 108 रुग्णवाहिका आणि (मो) 

येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करावे आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर तरी आमच्या भागाला आरोग्य सेवा बहाल करून आमचे आरोग्य सुधारण्यास मदत करावी. 
हि नम्र विनंती. अशा आशयाचे निवेदन देऊन

 श्री बबन वानखेडे हे नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्ना शासन दरबारी ते मांडण्याचा प्रयत्न करतात बबन वानखेडे हे 80 टक्के  समाजकारण व 20 टक्के राजकारण या माध्यमातून ते काम करतात मौजे सिंदगी येथे आरोग्य केंद्र उभारल्यास 

या परिसरातील लोकांना त्यांचा भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा तर होईलच परंतु किनवट- माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग हा विकासाच्या मार्गाकडे धावण्याचा प्रयत्न करेल म्हणजेच या परिसरातील जनसामान्य हे आरोग्यदायी होण्यास मदत होईल हे मात्र निश्चित असे जनसामान्यातून बोलल्या जात आहे.