Ticker

6/recent/ticker-posts

इस्लापूर पोलीस ठाण्याच्या समोर एकाने अंगावर पेट्रोल टाकत पेटवून घेतले. .नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.


इस्लापूर पोलीस ठाण्याच्या समोर एकाने अंगावर पेट्रोल टाकत पेटवून घेतले. .नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.

इस्लापूर ( वार्ताहार )

भिशी येथील ४३ वर्षीय तरुणाने इस्लापूर पोलीस स्टेशन समोरच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची घटना दिनांक १६  एप्रिल च्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडल्याने इस्लापूर शहरात एकच खळबळ उडाली, 

या घटनेत सदरील तरूण ६० टक्के भाजला असुन त्यास इस्लापुर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड च्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


सदरील घटनेचे सविस्तर वृत्त असे की भिशी येथील विकास माधव कायपलवाड हा तरुण भिशी येथील तलावातून मत्स्य व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत होता,

सदरील तरुणास व त्याच्या आईवडिलास लिंबाजी कायपलवाड व देवानंद पोषट्टी हे त्यास तलावातील मासे पकडण्यास जाणीवपूर्वक अडचण निर्माण करून त्याला व त्याच्या कुटुंबीयांना नाहक त्रास देत जिवे मारण्याची धमकी देत होते, 

या त्रासाला कंटाळून विकास कायपलवाड यांनी इस्लापूर पोलीस स्थानकात दिनांक २३ मार्च २०२३रोजी तक्रार दाखल केली होती, 

या तक्रारीच्या अनुषंगाने इस्लापूर पोलिसांनी सदरील  मंडळीवर गुन्हा दाखल करत प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सदरील मंडळीचा होणारा त्रास न थांबल्याने विकास कायपलवाड 

यांनी दिनांक ६एप्रिल २०२३ रोजी नांदेड पोलीस अधीक्षकाकडे लेखी निवेदन देत वरील लोकांकडून होणारा त्रास कमी करावा अशी मागणी केली होती. 

पण विकास कायपलवाड यांनी अचानक टोकाचे पाऊल  उचलत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले यात ते ६०% भाजले असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सहायक पोलिस निरिक्षक रवी वाहुळे यांनी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.