डॉक्टर आंबेडकर जयंती व रमजान निमित्त रात्री एक पर्यंत दुकाने सुरू ठेवा.
आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या मागणीला यश.
नांदेड प्रतिनिधी डॉक्टर आंबेडकर जयंती व रमजान उत्सवानिमित्त
सर्व दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या मागणीचे निवेदन आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले
त्यांचीही मागणी मंजूर झाल्याने या यशाबद्दल व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल ला आहे आंबेडकरी अनुयायांना कपडे व इतर खरेदी करण्यासाठी उन्हाचा चढलेला पारा याचा सामना करावा लागत आहे
व तसेच मुस्लिम बांधवांचे रोजे असल्याने त्यांनाही उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या आदेशाने दुकानेही रात्री दहा वाजता बंद होत होती तेव्हा
या महत्त्वपूर्ण मागणीच्या संदर्भाने नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिनांक 22 एप्रिल पर्यंत दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावेत